लडाखमध्ये मोठी दुर्घटना; लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने 9 जवान शहीद
Indian Army : लडाखमध्ये (Ladakh) एक मोठी दुर्घटना घडली आहे. कियारी (Kyari) शहरापासून 7 किमी अंतरावर झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराचे (Indian Army) 9 जवान शहीद झाले आहेत. त्यांचे वाहन खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला आहे. सैनिक कारू चौकीतून लेहजवळील कायरीकडे जात होते. शहीद झालेल्यांमध्ये एक जेसीओ आणि उर्वरित 8 जवान आहेत.
भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एएलएस वाहन लेहहून न्योमाकडे जात होते. संध्याकाळी 5:45 ते 6:00 च्या सुमारास ते कायरीच्या 7 किमी आधी दरीत घसरले. गाडीत लष्कराचे 10 जवान होते. यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला. एकजण जखमी झाला. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Army vehicle falls into gorge in Ladakh, nine jawans killed
Read @ANI Story | https://t.co/6WkNAriE8K#IndianArmy #Ladakh #Armyvehicle pic.twitter.com/mDBH3cU6Q7
— ANI Digital (@ani_digital) August 19, 2023
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, लडाखमधील लेहजवळ झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या मृत्यूने मी दु:खी आहे. त्यांनी देशासाठी केलेली अतुलनीय सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी जवानांना फील्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Saddened by the loss of Indian Army personnel due to an accident near Leh in Ladakh. We will never forget their exemplary service to our nation. My thoughts are with the bereaved families. The injured personnel have been rushed to the Field Hospital. Praying for their speedy…
— Rajnath Singh (@rajnathsingh) August 19, 2023