Download App

“मला मारुन टाक, मगचं…” : मुलीने बॅगेतून आणला आईचा मृतदेह, Inside Story ऐकून पोलिसही शहारले

Crime in Karnataka | बंगळूरू : कर्नाटकच्या राजधानीतील मायको ले आउट पोलीस स्टेशन. दुपारी साधारण 12 वाजले होते. 40 वर्षांची एक महिला भली मोठी सुटकेस घेऊन रिक्षातून पोलीस स्टेशनसमोर उतरते. ती सुटकेस ओढत ओढत पोलीस स्टेशनमध्ये दाखल होती. घरगुती वादातून संबंधित महिला घर सोडून आली असावी असा सुरुवातीला पोलिसांचा समज झाला. तिथं उपस्थित एका महिला पोलिस कॉन्स्टेबले महिलेला तिची ओळख आणि पोलीस स्थानकात येण्याचे कारण विचारले.  त्यावर तिने दिलेल्या उत्तरांनी पोलिसांच्याही अंगावर शहारे आले होते. (39-year-old woman, Senali Sen for allegedly killing her mother and stuffing her body in a trolley bag)

संबंधित महिला सांगते,

मी सेनाली सेन. पेशाने फिजिओथेअरपिस्ट आहे आणि मी माझ्या आईचा खून केला आहे.

तरुणीचे एवढे सहज उत्तर ऐकून पोलिसांना काही क्षण विश्वास बसत नाही. त्यावर तिने सोबत येताना भल्या मोठ्या सुटकेसमधून आणलेला आई विभा पालचा (६९) मृतदेह काढून दाखवला. तो सगळा प्रकार बघून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकते. पोलिसांनी तिला खुर्चीवर बसवून नेमका काय प्रकार आहे आणि कसा घडला याची विचारपूस करतात.

‘कोणीतरी डोळे वटारले, अन् दुसरी जाहिरात छापली’; जयंत पाटलांनी शिंदे गटाला डिवचलं

सेनाली सांगते, “मी मूळची कोलकाता येथील असून गेल्या 6 वर्षांपासून सासरच्या कुटुंबीयांसोबत बंगळुरूमध्ये राहत आहे. आई-वडील कोलकत्याला राहत होते. पण काही दिवसांपूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आई एकटी पडली होती. त्यामुळे आईला मी माझ्यासोबत राहण्यासाठी बोलावून घेतले. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही ठीक चालेले होते. पण काही दिवसातच आई आणि सासुबाईंचे खटके उडण्यास सुरुवात झाली. खटक्यांचे रुपांतर हळू हळू वादात झाले. मी आणि माझे पती या दोघींमधील वाद शमविण्यासाठी सतत प्रयत्न करायचो”.

“पण त्याचा फारसा उपयोग होतं नव्हता. या सगळ्याला वैतागून मी नोकरी सोडली. पण त्यानंतरही या दोघींमधील वाद थांबत नव्हते. आईला आणि सासुबाईंना मी नियमित समजावत होते. त्यावर आई मला सारखी म्हणायची, मला एकदा मारुन टाक, तेव्हाच हा वाद संपेल आणि आयुष्य नीट होईल. रविवारीही अशाच काहीशा कारणावरुन दोघांमध्ये वाद उफळला. मी दोघींनाही समजावून सासुबाईंना दुसऱ्या खोलीत जाण्याची विनंती केली. पण आई शांत होण्याचं नाव घेत नव्हती. ती पुन्हा सगळं तेच बोलू लागली.”

घनश्याम शेलार पाचव्यांदा पक्षांतराच्या तयारीत; BRS ला नगर जिल्ह्यात मिळणार तगडा शिलेदार!

“यानंतर मी आईला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि पाण्याचा ग्लास देताना म्हंटलं आता खरंच तु मेल्यानंतरच सगळं ठीक होईल. आईने याकडे फारसे लक्ष न देता गोळ्या खाल्ल्या. मात्र त्यानंतर तिच्या पोटात दुखू लागलं. आईला होणारा त्रास मला पाहवतं नव्हता आणि मी आईचा गळा दाबून तिला मारुन टाकलं. याबाबत आपल्या पती आणि सासूला काहीही माहिती नाही.”

दरम्यान, सेनालीचा हा सर्व जबाब ऐकून पोलिसही काही क्षण सुन्न झाले. यानंतर सेनालीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तिला अटक केली असून पोलीस तिची चौकशी करत आहेत.

Tags

follow us