Earthquake in Delhi : राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल एवढी होती. दरम्यान जम्मू-कश्मिरलाही भूकंपाचे हादरे बसल्याचं सांगण्यात येत आहे. ही माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिली आहे. ( 5.4 Richter scale Earthquake in Delhi and Jammu-Kashmir has too shocks )
Cabinet Decision: ग्रामसेवकांच्या वेतनात १० हजाराची वाढ तर शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी
या भूकंपाविषयी नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जम्मू-कश्मीरमध्ये हे धक्के दोहा जिल्ह्यातील गंदोह भलेसा या गावापासून 18 किलोमीटर अंतरावर 30 किलोमीटर खोलीवर जाणवले आहेत. त्यामुळे दोहा हे या भूकंपाचे केंद्र ठरले आहे. हे हादरे जाणवल्याने यावेळी शालेतील मुलं घाबरली होती. त्यांना तात्काळ वर्ग खोल्यांतून बाहेर काढण्यात आले तर इतर नागरिकांनी देखील आपापले घरं, दूकानं सोडून बाहेर आले होते.
त्याचबरोबर या भूकंपाचे धक्के राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक ठिकाणी जाणवले. त्यामध्ये हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यातील काही गावं. तसेच पंजाबमधील चंडीगड, गुरूदासपूर, होशियारपूर, लुधियाना जालंधरसह संपूर्ण राज्यात हे धक्के जाणवले. तसेच हरियाणातील फतेहाबाद या ठिकाणी हादरे बसल्याचं सांगण्यात येत आहे. तर यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही.
दरम्यान असं देखील सांगण्यात येत आहे की, गेल्या काही दिवसांपूर्वी देखील असे धक्के उत्तर भारतात जाणवले होते. त्यानंतर आता थेट 5.4 रिश्टर स्केल एवढी तीव्रता असणारा भूकंप झाला आहे. त्याचबरोबर अनेकांकडून बिजरजॉय या चक्रिवादळामुळे हा भूकंप झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता मात्र यावर तज्ज्ञांनी बिजरजॉय या चक्रिवादळाचा आणि या भूकंपाचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.