भारताचं नागरिकत्व सोडण्याच्या आकडेवारीत 5 टक्क्यांनी घट; फसवणुकीच्या प्रकारामुळे नागरिक जागरूक

सततच्या फसवणुकीच्या प्रकारामुळे भारतीय नागरिक जागरूक. मागच्या तीन वर्षांचा विचार केला तर भारत सोडणाऱ्या भारतीयांची संख्या 5 टक्क्यांन कमी.

Untitled Design (94)

Untitled Design (94)

5% fewer people renounced citizenship in 3 years : बाहेरच्या देशांत नोकरीला भारतीय नागरिक कायमच पसंती देत असतात. मात्र आता ही आकडेवारी कमी झाली आहे. त्यामागील कारण देखील तसंच आहे. सततच्या फसवणुकीच्या(Fraud) प्रकारामुळे भारतीय नागरिक जागरूक होत आहेत. मागच्या तीन वर्षांचा विचार केला तर भारत सोडणाऱ्या भारतीयांची(Indians) संख्या 5 टक्क्यांनी कमी झाली आहे. केंद्र सरकारने(Central Government) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये 2,06,378 लोकांनी भारतीय नागरिकत्व(Indian citizenship) सोडलं आहे. तर वर्ष 2023 मध्ये ही संख्या 2,16,219 होती, आणि वर्ष 2022 मध्ये ही संख्या 2,25,620 होती.

मागच्या 5 वर्षांत सुमारे 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडलं आहे. राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंती कीर्ती वर्धन सिंग(Kirti Vardhan Singh) म्हणाले की , मागच्या 5 वर्षांत 8,96,843 भारतीयांनी आपलं नागरिकत्व सोडलं आहे.

कोणत्या वर्षी किती भारतीयांनी आपलं नागरिकत्व सोडलं?
2022 साली 2,25,620
2023 साली 2,16,219
2024 साली 2,06,378

तीन महिन्यांत केवळ 98 मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र; मुख्यमंत्री साहेब अन् विखे पाटील साहेब म्हणत जरांगेंचा इशारा

परदेशात नोकरीच आमिष दाखवणाऱ्या कंपन्यांवर आता भारत सरकारने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. नोकरीच्या खोट्या प्रस्तावावर एका कंपनीला नोटीस देखील बजावण्यात आली आहे. सदरील कंपनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीयांना टार्गेट करते. दक्षिण आशियायी देशांमध्ये नोकरीसाठीच आमिष या कंपनीकडून दाखवलं जातं. राज्यसभेत परराष्ट्र राज्यमंत्री म्हणाले की, अशा प्रकरणांमधून 6700 भारतीयांची सुटका करण्यात आली आहे.

2024-25 या वर्षांमध्ये परदेशात राहणाऱ्या किती भारतीयांनी तक्रार केली, असा प्रश्न राज्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. परराष्ट्र मंत्रालयाला एकूण 16,127 तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी दिली आहे. यापैकी 11,195 तक्रारी MADAD पोर्टलद्वारे आणि 4,932 तक्रारी या CPGRAMS द्वारे नोंदवण्यात आल्या आहेत.

यापूर्वी 2011 ते 2019 या कालावधीत 11,89,194 भारतीयांनी नागरिकत्व सोडले होते. 2011 मध्ये 1,22,819, 2012 मध्ये 1,20,923, 2013 मध्ये 1,31,405, 2014 मध्ये 1,29,328, 2015 मध्ये 1,31,489, 2016 मध्ये 1,41,603, 2017 मध्ये 1,33,049, 2018 मध्ये 1,34,561 आणि 2019 मध्ये 1,44,017 लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले.

Exit mobile version