Download App

ED चा मनीष सिसोदियांना दणका, तब्बल 52 कोटींची संपत्ती जप्त

Manish Sisodia : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली. त्यानंतर सिसोदिया यांनी दिल्ली उच्च न्यालयालयात (Delhi High Court) जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज फेटाळत न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. त्याचवेळी सीबीआयनेही आरोपपत्रात अनेक दावेही केलेत. अशातच आता मनीष सिसोदिया यांची मालमत्ताही ईडीने (ED) जप्त केली आहे. त्यामुळं सिसोदिया यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. ईडीने (ED) एकूण 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. (52 crore property of Manish Sisodian seized by ED)

ईडीने प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत मनीष सिसोदिया आणि त्यांची पत्नी आणि इतरांची 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यापैकी 44 कोटी रुपयांची संपत्ती एकट्या सिसोदिया यांच्या मालकीची आहे. यामध्ये मनीष सिसोदिया आणि त्यांची पत्नी सीमा सिसोदिया यांच्या दोन मालमत्तांचा समावेश आहे. दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. यामध्ये मनीष सिसोदिया, अमनदीप सिंह ढाल, राजेश जोशी, गौतम मल्होत्रा ​​यांच्यासह अन्य आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये मनीष सिसोदिया यांच्या 11.49 लाख रुपयांच्या बँक ठेवी, ब्रिंडको सेल्स प्रायव्हेट लिमिटेड (16.45 कोटी रुपये) आणि 44.29 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता देखील समाविष्ट आहे, असे एजन्सीने सांगितले. ईडीने सांगितले की जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 52.24 कोटी रुपये आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी रडकुंडीला येऊन शरद पवारांना काय सांगितलं होतं? 

ED आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने आरोप केला आहे की दिल्ली सरकारचे 2021-22 चे उत्पादन शुल्क धोरण काही मद्य विक्रेत्यांना अनुकूल होते. सिसोदिया यांनी त्यासाठी लाच घेतली होती. दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. नंतर हे धोरण रद्द करण्यात आले आणि दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरने सीबीआय चौकशीची शिफारस केली, त्यानंतर ईडीने पीएमएलए अंतर्गत सिसोदिया यांच्यावर गुन्हा नोंदवला. सिसोदिया ईडीने अबकारी धोरणाशी संबंधित गैरव्यवहारातमधये मार्चमध्ये ईडीने अटक केली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. सिसोदिया यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 120बी, 201 आणि 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7, 7अ, 8 आणि 13 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज