Download App

तब्बल 6500 हून अधिक ‘Super-Rich’ करणार भारताला ‘गुड-बाय’ : रिपोर्ट

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : शिक्षण, नोकरी किंवा फिरण्याच्या निमित्ताने परदेशात जाणाऱ्या व्यक्तींबाबत तुम्ही ऐकलं किंवा वाचलं असेल. मात्र, एका रिपोर्टमधून यावर्षी थोडे थोडके नव्हे तर, तब्बल 6500 हून अधिक सुपर रिच (India Super Rich People) व्यक्ती भारताला कायमचं गुडबाय करण्याच्या विचारात आहेत. हेन्ली प्रायव्हेट हेल्थ मायग्रेशन रिपोर्टनुसार हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (6500 Super Rich People Leave India In 2023 ) 

Nagpur Rain Update : नागपुरात नेमकी परिस्थिती कशी?; फडणवीसांनी सांगितली ग्राउंड रिअ‍ॅलिटी

देशसोडून जाणाऱ्यांमध्ये भारतासह जगभरातील अन्य देशातील करोडपतींचाही समावेश असून, चीनमधून सर्वाधिक करोडपती देश सोडून इतर देशांमध्ये स्थानिक होतील असा अंदाज या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आला असून, या आकडेवारीत चीन पहिल्या तर, भारत दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी साडेसात हजार अतिश्रीमंत व्यक्तींनी भारत सोडून इतर देशात स्थायिक झाले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी जरी कमी असली तरी रिपोर्टमध्ये देण्यात आलेली आकडेवारी भारतासाठी काहीशी चिंता वाढवणारी आहे.

सर्वाधिक नागरिक चीनला करणार रामराम

देश सोडून जाणाऱ्यांमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर असून, चीन आघाडीवर आहे. यावर्षी चीनमधून सर्वाधिक 13,500 नागरिक देशाला रामराम करतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, युनायटेड किंगडमधून 3,200, रशियातून 3,000 आणि ब्राझीलमधून 1,200 नागरिक देश सोडण्याची शक्यता आहे. भारतातून सोडून जाणाऱ्या व्यक्तींची ऑस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट्स आणि स्वित्झर्लंड या देशांना सर्वाधिक पसंती असल्याचेही यात म्हटले आहे.

WC 2023 : बाबर आजमचं प्लानिंग फिसकटणार?, पाक संघाला सोडून 8 देशांना मिळाला व्हिसा

फक्त भारत आणि चीनच नव्हे, तर रशिया, युके, ब्राझिल, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, जपान, व्हिएतनाम, नायजेरियातूनही अनेक नागरिक जगातील इतर देशांमध्ये संधीच्या शोधात स्थायिक होणार आहेत. यापैकी बहुतांशी धनाढ्य मंडळी ही ऑस्ट्रेलिया, युएई, अमेरिका, स्वित्झर्लंड, कॅनडा, ग्रीस, फ्रान्स, पोर्तुगाल, न्यूझीलंड, इटली यांसारख्या देशांमध्ये स्थायिक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, दरवर्षी 2.5 दशलक्ष भारतीय स्थलांतर करतात. सध्या अनिवासी भारतीय आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींसह भारतीय डायस्पोराची एकूण संख्या 32 दशलक्ष आहे. त्यामुळे, 6,500 भारतीयांचे परदेशात स्थलांतर होणे ही फार मोठी समस्या नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

Sharad Pawar : पवारांनी गुजरात गाठलं, थेट अदानींच्या घरी दाखल; खास भेटीची चर्चा तर होणारच!

भारतीय श्रीमंतांची देश सोडण्याची कारणे कोणती?

भारतात करसंबंधित नियमांमधील गुंतागुंतीमुळे दरवर्षी हजारो श्रीमंत लोक देश सोडून जातात. ऑस्ट्रेलिया, दुबई आणि सिंगापूर येथे कर संबंधित असणारी लवचिकता यामुळे या देशांमध्ये स्थायिक होण्यामागचे एक कारण मानले जाते. याशिवाय उच्च राहणीमान, जागतिक दर्जाचे शिक्षण आणि आरोग्य सुविधा, स्थिर राजकीय वातावरण आदी गोष्टींचाही यात समावेश आहे. तसेच स्थिर बँकिंग प्रणाली मजबूत चलनात कमाई करण्याची आणि रुपयामध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते यामुळे देखील अनेक श्रीमंत व्यक्ती भारताबाहेर जात आहेत.

Tags

follow us