Nagpur Rain Update : नागपुरात नेमकी परिस्थिती कशी?; फडणवीसांनी सांगितली ग्राउंड रिअॅलिटी
Nagpur Rain Update : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Nagpur Rain) झाला. नागपूरमध्ये मात्र आपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला. या पावसाने नागपूरमध्ये (Nagpur Rain) हाहाकार माजवला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाची तीव्रता एवढी होती की, त्यामुळे एका रात्रीत अवघ्या 4 तासात 106 मिलीमीटर पाऊस झाला. पावसाने विस्कळीत झालेले नागपुरातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासन संपूर्ण क्षमतेने मदत कार्याला लागले आहे. आता येथील पाऊस थांबला असून नेमकी काय परिस्थिती आहे, याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जयंत पाटील, आव्हाड, रोहित पवारांच्या आमदारकीवर टांगती तलवार; अजित पवार गटाचं मोठं पाऊल
फडणवीस म्हणाले, आता शहरातील पाणी ओसरायला लागलं आहे. पण, अद्यापही काही भागात पाणी आहे. पूरस्थिती दरम्यान मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. शंकरनगर भागातील मूकबधीर विद्यालायातील मुलांना बाहेर काढण्यात आले. एलएडी कॉलेजमधील मुलींना बाहेर काढण्यात आले. पावसाची परिस्थिती पाहता शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
या पुरातून जवळपास 400 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. मी स्वतः या ठिकाणी जाणार आहे. पाणी ओसरत असल्याने परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये. अडचणीच्या काळात प्रशासनाशी संपर्क साधावा. मी स्वतः पहाटेपासूनच प्रशासनाच्या संपर्कात आहे असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान हवामान विभागाने शुक्रवारी विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार नागपूरमध्ये पाऊस सुरूच होता. मात्र सायंकाळनंतर बा पाऊस इकका वाढाला की, शहरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. या पावसाची तीव्रता एवढी होती की, त्यामुळे एका रात्रीत अवघ्या 4 तासात 106 मिलीमीटर झालेल्या पावसाने विस्कळीत झाले. नागपुरात गेल्या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
Maharashtra Rain : नागपुरात मुसळधार! ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट