Download App

भारत- पाकिस्तान तणाव वाढला, देशात बंद होणार 8 हजार पाकिस्तानी X अकाउंट

भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावात भारत सरकारने 'एक्स' ला आदेश देत देशात सुरु असलेल्या 8 हजार पाकिस्तानी एक्स अकाउंट

 X Accounts : भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावात भारत सरकारने ‘एक्स’ ला आदेश देत देशात सुरु असलेल्या 8 हजार पाकिस्तानी एक्स अकाउंट बंद करण्याचे आदेश दिले आहे.  पाकिस्तानकडून चुकीची माहिती थांबवण्यासाठी भारत सरकारने ‘एक्स’ला आदेश दिले आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून भारतातील अनेक शहरात हल्ले करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. आतापर्यंत भारतीय लष्कराकडून 50 पेक्षा जास्त ड्रोन पाडण्यात आले आहे. तर आता भारताने देखील पाकिस्तानवर हवाई हल्ले सुरु केली असल्याची माहिती समोर आली आहे. भारताकडून लाहोर, कराची आणि पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे हवाई हल्ले करण्यात येत आहे. यादरम्यान सोशल मीडियावर पाकिस्तानकडून येणारी चुकीची  माहिती  थांबवण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेत  ‘एक्स’ ला देशातून 8 हजार अकाउंट बंद करण्याचे आदेश दिले आहे.

follow us

संबंधित बातम्या