9 UDP MLAs In Talks With BJP In Meghalaya For Likely Merger : मेघालयात राजकीय समीकरणे मोठ्या उलथापालथीच्या दिशेने जात आहे. भाजप (BJP) आणखी एक पक्ष फोडण्याच्या तयारीत आहेत. सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टी (NPP)च्या नेतृत्वाखालील आघाडीतील घटक पक्ष असलेल्या युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे (UDP) तब्बल 9 आमदार भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
UDP आणि भाजप हे दोन्ही पक्ष मेघालयातील सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टीच्या नेतृत्वाखालील आघाडीचा भाग आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातील आमदारांना फोडण्याऐवजी भाजपने आपल्याच मित्रपक्षातील आमदारांनासोबत घेण्याच्या हालचाली सुरू केल्याचे चित्र आहे.मेघालयच्या राजकीय वर्तुळात सध्या UDPच्या नऊ आमदारांच्या संभाव्य पक्षांतराची जोरदार चर्चा आहे. हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
‘आमचे मंत्री आताही जरांगे पाटलांशी चर्चा करत आहेत’; एकनाथ शिंदेंनी परभणीत स्पष्ट केली सरकारची भूमिका
कसे आहे संख्याबळ ?
मेघालय विधानसभेत एकूण 60 जागा आहे. एनपीपीचे 26 आमदार आहेत. तर यूडीपीचे बारा आमदार, तर काँग्रेसचे पाच आमदार आहेत. भाजपचे सध्या केवळ दोन आमदार आहेत. UDPच्या नऊ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास भाजपची विधानसभा सदस्यसंख्या दहाच्या पुढे जाऊ शकते.
अमित शाह यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
UDPच्या आमदारांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत परदेशी योगदान नियमन कायदा (FCRA) तसेच मेघालयशी संबंधित इतर मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे UDPकडून सांगण्यात आले. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अधिक व्यापक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास आता अधिक वेगवान होणार; दीड तास वेळ वाचणार
भाजपला अधिक मंत्रिपदे मिळण्याची शक्यता
UDPच्या आमदारांचे भाजपमध्ये संभाव्य विलिनीकरण झाल्यास विधानसभेचे संख्याबळ बदलणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आघाडीतील सत्ता आणि मंत्रिपदांच्या वाटपावरही परिणाम होऊ शकतो. या संभाव्य राजकीय फेरबदलाच्या बदल्यात भाजपला मंत्रिमंडळात अधिक जागा देण्याची मागणी चर्चेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. असे झाल्यास या राज्यात भाजपच्या आमदारांची संख्या वाढेल आणि एनपीपी कमकूवत होईल. एनपीपीचे कॉनराड काँगकल संगमा हे सध्या मुख्यमंत्रीपदावर आहेत. त्यामुळे त्यांची खुर्ची डळमळीत होईल.
