Download App

भाजप आमदाराचं IAS परीशी जुळलं सुत! लाखोंचं वऱ्हाड अन् तीन ठिकाणी रिसेप्शन

Bhavya Bishnoi : भाजपचे नेते कुलदीप बिश्नोई (Kuldip Bishnoi) यांचा मुलगा विद्यमान आमदार भव्य बिश्नोई (Bhavya Bishnoi) यांचं आएएस अधिकारी परी बिश्नोई (Pari Bishnoi) यांच्याशी अखेर सूत जुळलं आहे. येत्या 22 डिसेंबर रोजी दोघेही लग्न बंधनात अडकणार आहेत. भव्य बिश्नोई यांची पत्नी परी बिश्नोई सिक्कीम केडरच्या IAS अधिकारी आहेत. सध्या IAS परी गंगटोकमध्ये उपविभागीय दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विवाहानंतर बिश्नोई परिवाराकडून तीन वेगवेगळ्या तारखेला वेग-वेगळ्या ठिकाणी रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी देशभरातून जवळपास दीड लाखांपेक्षा अधिक पाहुणे उपस्थित राहणार असल्याचं भाजप नेते कुलदीप बिश्नोई यांनी दिली आहे.

मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, सभागृहात उपस्थित राहण्यासाठी खासदारांना व्हिप जारी

कुलदीप बिश्नोई यांनी विवाह सोहळ्यासाठी मतदारसंघातील सर्वच गावांतील मतदारांना निमंत्रण दिलं असून जवळपास 3 लाख नागरिकांना निमंत्रण दिलं आहे. भव्य बिश्नोई हे आदमपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. याच मतदारसंघातून भव्य बिश्नोई यांचे आजोबा हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांनी 1968 च्या निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर भजनलाल यांनी 1977 ते 2005 दरम्यान येथून आणखी सात निवडणुका जिंकल्या, तर त्यांची पत्नी जसमा देवी यांनी 1987 मध्ये या जागेवर विजय मिळवला.

कुलदीप यांनी 1998 ची पोटनिवडणूकही येथून जिंकली, तर कुलदीपची पत्नी रेणुका यांनी 2012 मध्ये या जागेवरून पोटनिवडणूक जिंकली. २०२२ मध्ये ही जागा भव्य यांच्याकडे देण्यात आली आहे. 2022 मध्ये भव्य यांनी भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणूक जिंकली. त्यानंतर आदमपूरचे आमदार कुलदीप यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.

हुंड्यात BMW कार, 150 ग्रॅम सोनं अन् 15 एकर जमीन; लग्न मोडल्यानं डॉक्टर तरुणीनं संपवलं आयुष्य

राजस्थानामधील पुष्करमध्ये 24 डिसेंबरला तर 26 डिसेंबर आदमपूर आणि 27 डिसेंबरला नवी दिल्लीत रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. पुष्कर येथील कार्यक्रमासाठी राजस्थानमधील पाहुण्यांना आमंत्रणे पाठवली जात आहेत. पुष्कर इथल्या कार्यक्रमाला 30 ते 50 हजार पाहुणे येण्याची शक्यता आहे. तर आदमपूरच्या कार्यक्रमासाठी एक लाखांपेक्षा अधिक पाहुणे येणार आहेत. दिल्लीत केंद्रीय नेत्यांसह 2500 ते 3000 पाहुणे उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याचं कुलदीप यांनी स्पष्ट केलं आहे.

‘लोकसभेतही विरोधकांचं पानिपत’; ‘लोकसभा बॅलेटवर’ म्हणणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं

कुलदीप यांची सहप्रभारीपदी नियुक्ती :

आदमपूर हा भाजप नेते कुलदीप बिश्नोई घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. मागील अनेक वर्षांपासून या मतदारसंघात त्यांच्या घराण्यातील सदस्यांचा पगडा राहिलेला आहे. या पार्श्वभूमीवर आता कुलदीप यांना भाजपकडून सहप्रभारी बनवले जात आहे.

दरम्यान, 18 नोव्हेंबर 1991 रोजी माझं लग्न झाले तेव्हा माझे वडील चौधरी भजनलाल यांनीही वैयक्तिकरित्या या सर्व गावांना भेट दिली होती. त्यावेळी ते राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी माझ्या विवाहाचं सर्वांनाच निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे आता भव्यच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण देण्याचं काम सुरु असल्याचं कुलदीप यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us