Download App

ब्रृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ, लैंगिक अत्याचारासह ‘या’ गुन्ह्यांखाली आरोपपत्र दाखल

  • Written By: Last Updated:

Brijabhushan Sharan Singh charge sheet : सहा कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या प्रकरणात भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह (Brijabhushan Sharan Singh) यांच्या अडचणी वाढू शकतात.महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून ब्रृजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र (charge sheet) दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ब्रृजभूषण यांना लवकरच शिक्षा होईल, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. (a charge sheet has been filed against Brijbhushan Singh sexual assault case)

https://www.youtube.com/watch?v=I2f9gQrbQD0

ब्रृजभूषण शरण सिंह यांच्यावर काही महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. या तक्रारीत चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, आमिष दाखवणे, असे आरोप करण्यात आले होते. मात्र, हे आरोप ब्रृजभूषण यांनी फेटाळून लावले. या आरोपांनंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पैलवानांनी जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले.

केंद्राला सर्वोच्च न्यायालयाचा दणका! ईडी संचालकांना मुदत वाढ नाहीच… 

दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या धरणे आंदोलनाला अखेर यश आले. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे. ब्रृजभूषण यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून आता याप्रकरणी सुनावणी होणार आहे. ब्रृजभूषण यांच्या यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रात दिल्ली पोलिसांनी दावा केला आहे की, त्यांना खटल्याला सामोरे जावे लागू शकते. यामध्ये पोलिसांनी या खटल्याशी संबंधित 15 साक्षीदारांचे जबाब प्राथमिक आधारावर घेतले आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी इंडोनेशिया, कझाकिस्तान, बल्गेरिया, मंगोलिया आणि किर्गिस्तान या कुस्ती महासंघांकडून फोटो आणि व्हिडिओ मागवले आहेत.

आरोपपत्रात काय आरोप केले?

पोलिसांनी आयपीसी कलम ५०६ (गुन्हेगारी धमकावणे), ३५४ (महिलेचा विनयभंग करणे), ३५४ए (लैंगिक छळ) आणि ३५४डी (पाठलाग करणे) या कलमा अंतर्गत १३ जून रोजी सिंग यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्राची दखल घेत राऊस अव्हेन्यू कोर्टाने ब्रृजभूषण आणि विनोद तोमर यांना ११ जुलै रोजी समन्स बजावले आहेत.

या संपूर्ण प्रकरणात त्याची साक्ष महत्त्वाची मानली जात आहे. या प्रकरणी ब्रृजभूषण शरण सिंह यांना १८ जुलै रोजी न्यायालयात हजर राहायचे आहे. दरम्यान, आता ब्रृजभूषण यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्याने त्यांना आता सुनावणीसाठी बोलावले जाऊ शकते. यासोबतच या आरोपपत्रात ज्या साक्षीदारांची नावे आहेत त्यांनाही बोलावले जाईल, असे आरोपपत्रात म्हटले आहे. सुनावणीनंतर ब्रृजभूषण यांनी शिक्षा होईल, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

Tags

follow us