Weather Updates : देशातील काही राज्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाल्यानं ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या आठवड्यातही देशाच्या अनेक भागात पावसाच्या सरी (Unseasonal rain) कोसळल्या होत्या. त्यामुळं पिकं धोक्यात आली आहे. अशातच आज हवामान खात्याने मोठी अपडेट दिली आहे. आता पुन्हा एकदा अवकाळीचं संकट (IMD Weather Forecast) उभं ठाकलं आहे. 16 जानेवारीपर्यंत नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स (Western Disturbance) सक्रिय होण्याची शक्यता आहे.
लोकप्रिय उर्दू शायर मुनव्वर राणा यांचे निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी मालवली प्राणज्योत
वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता असल्यानं देशात पुन्हा एकदा हवामानात बदल होईल असा IMDचा अंदाज आहे. ऐन संक्रांतीच्या दिवशीच देशातील राज्यांमध्ये अतिवृष्टी होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. काही भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद येथे पुढील48 आठवड्यांत मुसळधार पाऊस पडेल, असे IMD ने म्हटले आहे.
Horoscope Today : आज ‘या’ दोन राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
याशिवाय जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, दक्षिण भारतात तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, किनारी आंध्र प्रदेश, यानाम, रायलसीमा आणि दक्षिण कर्नाटकमध्ये, ईशान्य मोसमी वारे थांबण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत या भागात मुसळधार पावसाची शक्यता (रेन अलर्ट) आहे. केरळ आणि लक्षद्वीपमध्ये कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. आज आणि उद्या दक्षिण तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.
काश्मीर खोऱ्यात हिमवृष्टीची शक्यता
IMD ने आज उत्तरेकडील पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, येत्या ४८ तासांत काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात काही भागात पावसाचा अंदाज
गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण निवळलं आहे. त्यामुळं पुन्हा थंडी पडू लागली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडेल, तर उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
तीन दिवस थंडीची लाट
हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे किमान तापमानात घट नोंदवली जाईल. किमान तापमान 12 ते 14 अंशांच्या आसपास राहील. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस उत्तरेकडे थंडीची लाट दिसून येईल. येत्या काही दिवसांत उत्तरेकडील भागात थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही.