पुन्हा धो धो…, अहिल्यानगर, बीडसह ‘या’ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

IMD Rain Alert : राज्यात गेल्याकाही दिवसांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) सुरु असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे अहिल्यानगर (Ahilyanagar), पुणे (Pune) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे राज्यात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाकडून पुढील चार दिवसांसाठी अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह होण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
पुढील चार दिवस पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 20 मे च्या रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम पाहायला मिळाला. ज्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट?
मुंबई, पुणेसह ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक , सातारा, सांगली, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरो, वाडगाव, गडचिरो, नांदेड या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
11 वी साठी प्रवेश प्रक्रिया सुरु पण पहिल्या दिवशी वेबसाईट ठप्प, विद्यार्थांचा उडाला गोंधळ
या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट?
तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा , सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिवमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि वादळी वारे येऊ शकतात आणि ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहू शकतात. अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.