बंगाल विधानसभा निवडणुकीत (BJP) भाजपच्या प्रचंड विजयानंतर, बंगालचे नवे मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न उपस्थित होत होता. पण याबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. सुवेंदू अधिकारी हे बंगालचे पुढील मुख्यमंत्री असतील, उद्या गुरुवारी त्यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड होईल अशी सुत्रांची माहिती आहे. २९३ सदस्यांच्या बंगाल विधानसभेत २०७ जागा जिंकून भाजपने इतिहास रचला आहे.
रॅम्प वॉक ते राजभवन : बॉलिवूडला सजवणारी डिझायनर होणार बंगालची मुख्यमंत्री?
सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची चर्चा आधीपासूनच सुरू होती. त्यांनी बंगालमधील भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आणि नंदीग्रामची जागाही जिंकली. त्यांना बंगालमधील भाजपचा मुख्य चेहरा मानलं जातं. सुवेंदू ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीमधून भाजपमध्ये सामील झालेले नेते आहेत. मात्र, निवडणुकीच्या काळात ते ममता यांच्या विरोधात सर्वाधिक आक्रमक होते. २०२१ ते २०२६ च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत सुवेंदू यांनी ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान दिलं आहे.
बंगालमध्ये भाजपच्या हिंदुत्ववादी अजेंड्याला धार देणारे सुवेंदू अधिकारी हे बंगालच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. भाजपचे माजी अध्यक्ष दिलीप घोष आणि बंगाल भाजपचे विद्यमान अध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांच्या नावांचीही चर्चा होती. महिला उमेदवारांमध्ये रूपा गांगुली आणि भाजपच्या धडाकेबाज नेत्या अग्निमित्रा पॉल यांच्या नावांचीही चर्चा होती. पण आता सस्पेन्स संपला आहे. सुवेंदू हे बंगालचे नवे मुख्यमंत्री असतील अशीच सूत्रांची माहिती आहे.
कोण आहेत सुवेंदू अधिकारी?
सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालमधील नंदीग्रामचे आमदार आहेत. एक तळागाळातील नेते म्हणून त्यांनी एकेकाळी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्याला तृणमूल काँग्रेसचा (TMC) बालेकिल्ला बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. ५५ वर्षीय सुवेंदू अधिकारी यांना एक प्रतिष्ठिती राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असून त्यांचा पूर्व पूर्व मेदिनीपूरमध्ये मोठा प्रभाव आहे. या प्रभावामुळेच अधिकारी कुटुंबाला या भागात “राजकीय सम्राट” म्हणून ओळखले जाते. अधिकारी कुटुंब मुळचं काँग्रेसी होतं. परंतु, ममता बॅनर्जी यांनी १९९८ मध्ये तृणमूल काँग्रेसची स्थापना केल्यानंतर अधिकारी कुटुंब या पक्षात सामिल झाले
