कथीत गर्लफ्रेंडची ‘मुख्यमंत्री’ होण्याची इच्छा आणि थलपतीचा ‘विजय’; त्रिशा कृष्णनला वाढदिवसाची अनोखी भेट…?

अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिचं “मुख्यमंत्री व्हायचं आहे” हे जुनं विधान चर्चेच कारण ठरलं. आज या दोघांच्या कथीत नात्याला विजयचा निवडणूकीतील विजय आणि त्रिशाचं जुनं विधान याला योगायोग म्हणून पाहिलं जात आहे.

HHcrwTcbQAEpdHH

Vijay Political Rise Trisha Connection : साऊथ सुपरस्टार थलपती विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्याबद्दल सध्या सोशल मीडियात तुफान चर्चा रंगताना दिसत आहे. आज तमिळनाडू विधानसभा निवडणूक निकालाच्या दिवशी ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याला कारण ठरलं ते म्हणजे, अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिचं “मुख्यमंत्री व्हायचं आहे” हे जुनं विधान. (Trisha Krishnan statement CM) आज या दोघांच्या कथीत नात्याला विजयचा निवडणूकीतील विजय आणि त्रिशाचं जुनं विधान याला योगायोग म्हणून पाहिलं जात आहे. Trisha Vijay relationship rumors.

https://x.com/_TheLieLamaa/status/2051203190784512074?s=20

त्रिशा आज निकालाच्या दिवशीच सकाळीच तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी पोहोचली. विशेष म्हणजे आज (4 मे) त्रिशाचा 43 वा वाढदिवससुद्धा आहे. त्यामुळे हा योगायोग म्हणावा की नशीबाची साथ, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

तामीळ सुपरस्टार विजय यांची वेगाने पुढे सरकणारी राजकीय वाटचाल पाहिली तर, विजय यांनी अलीकडेच सक्रिय राजकारणात प्रवेश करत स्वतःचा पक्ष स्थापन केला. अल्पावधीतच त्यांनी प्रचंड जनाधार निर्माण केल्याचं निवडणूक निकालातून दिसून येत आहे. तामीळनाडूमध्ये सिनेसृष्टीतून राजकारणात येण्याची परंपरा जुनी असली तरी सर्वांनाच यश मिळालेलं नाही; मात्र एम. जी. रामचंद्रन आणि जयललीता यांच्यानंतर विजय यांच्याकडे पुढील मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जात आहे.

https://x.com/i/status/2051205911549788615

याच दरम्यान, त्रिशा आणि विजय यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनी या विषयाला आणखी वेग दिला आहे. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असून, त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीमुळे चाहत्यांमध्ये त्यांची जोडी लोकप्रिय आहे. अलीकडच्या काही सार्वजनिक घडामोडी, दोघेही एकत्र दिसल्याच्या चर्चा आणि विजय यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या तर्क-वितर्कांमुळे या जवळिकीच्या दाव्यांना अधिक हवा मिळाली आहे. विशेष म्हणजे विजय यांच्या पत्नी संगीता यांच्यासोबतच्या मतभेदांच्या चर्चा अधूनमधून समोर येत असल्यानेही या चर्चाना बळ मिळालं आहे.

या सगळ्या चर्चांमध्ये आणखी एक योगायोग चर्चेत आला आहे. त्रिशाचा आज वाढदिवस असून, त्याच दिवशी काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचे निकाल समोर आले आहेत. वाढदिवसानिमित्त त्रिशाने सकाळी तिरुपती मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिचं जुने विधान, विजय यांचा राजकीय प्रवास, आणि या सगळ्या घडामोडींचा एकत्रित संदर्भ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

https://x.com/i/status/2051172337840685411

एकूणच, त्रिशाचं विधान, विजय यांची राजकीय वाटचाल, त्यांना मिळत असलेला वाढता पाठिंबा, आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याभोवती फिरणाऱ्या चर्चांमुळे तामीळनाडूच्या राजकारणात आणि मनोरंजनविश्वात एक वेगळंच समीकरण तयार होताना दिसत आहे. मात्र या सर्व चर्चांमध्ये वास्तव, राजकारण आणि वैयक्तिक आयुष्य यातील सीमारेषा ओळखणंही तितकंच महत्त्वाचं ठरत आहे.

follow us