Download App

वायनाडच्या भूस्खलन दुर्घटनेत रेडिओ जॉकी ठरले मदतीचा हात; यंत्रणा अन् लोकांच्यामध्ये बांधला संवाद पूल

भूस्खलनानंतर केरळच्या वायनाड जिल्ह्याच्या डोंगराळ भागातील चार गावे जमिनीमध्ये गडप झाली. त्या प्रसंगात हॅम रेडिओ जॉकींनी महत्वाचं काम केलं.

  • Written By: Last Updated:

Wayanad Landslide : केरळमधील वायनाड जिल्ह्यात भूस्खलनानंतर (Landslide ) डोंगराळ भागातील चार गावं जमिनदोस्त झाली. काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं. शेकडो श्वास चिखलामध्ये अडकले. आभाळच फाटलं तिथं मदत कोण आणि कशी पुरविणार? पीडितांच्या व्यथा सरकारी यंत्रणेपर्यंत तरी कशा पोचणार? हा मोठा प्रश्न होता. हे आव्हान स्वीकारलं स्थानिक हौशी हॅम रेडिओ जॉकींनी आणि या संकट काळामध्ये त्यांनी संवादाचा पूल उभारला. त्यामधून अनेकांना मोठी मदत झाली आणि होत आहे.

Pune Rain Update: पुणेकरांनो सावध राहा ! हवामान विभागाचा रेड अलर्ट, खडकवासलातून विसर्ग वाढला !

हॅम रेडिओ जॉकींच्या प्रयोगामुळे मदत कार्याला मोठा वेग आला. मात्र, त्याचबरोबर अनेकांचे प्राणही वाचले. स्थानिक स्वयंसेवक बनलेल्या ऑपरेटरनी पुढाकार घेत कालपेट्टा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळघरामध्ये ही रेडिओ प्रणाली उभारण्याचे काम केलं. या रेडिओच्या माध्यमातून नेमकी कुठं काय परिस्थिती होती? याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांना कळत होती.

भूस्खलनानंतर वायनाडमधील परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. अनेक भागांमधील मोबाइल सेवाही ठप्प झाली होती. अशा स्थितीमध्ये जिल्हाधिकारी डी.आर. मेघश्री यांनी स्थानिक हॅम रेडिओ ऑपरेटरची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यामुळे नवी संवाद प्रणाली तयार होऊ शकली. हे हॅम रेडिओ स्टेशन चालवण्यासाठी रिसीव्हर, ॲम्पलीफायर, संगणकीय डिजिटल मॉड्यूलेशनचा आधार घेण्यात आला होता.

वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस पक्ष १०० पेक्षा जास्त घर बांधणार; राहुल गांधींची मोठी घोषणा

ऑपरेटरची कामगिरी

हॅम रेडिओ ऑपरेटरनी प्रत्यक्ष ज्या भागात भूस्खलन झाले आहे त्या ठिकाणची माहिती रेडिओ ट्रान्समीटरच्या माध्यमातून स्टेशनपर्यंत पोचविण्याचे काम केलं. अम्बालावायल पोनुमुडी कोट्टा येथे यासाठी रिपीटर सेटअप उभारण्यात आला होता. हॅम रेडिओ ऑपरेटरची संघटना असलेल्या ‘सुलतान बॅथरी डीएक्स असोसिएशन’ने हे शिवधनुष्य उचललं होतं.

follow us