America Imposed a 25 Percent Tariff on India : अमेरिका आणि भारत यांच्यात एक व्यापार करार झाला आहे. त्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने भारतावर २५ टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः याची घोषणा केली आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. आता ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर याबद्दल माहिती दिली आहे. या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत भारताची अमेरिकेला होणारी निर्यात २२.८ टक्क्यांनी वाढून २५.५१ अब्ज डॉलर्स झाली आहे. तर, आयात ११.६८ टक्क्यांनी वाढून १२.८६ अब्ज डॉलर्स झाली आहे.
Video : भारत माझा मित्र, माझ्या विनंतीवरुन युद्ध थांबवलं, ट्रम्प यांचा पुन्हा दावा
भारत हा आपला मित्र देश असला तरी देखील आपण त्यांच्याशी तुलनेनं कमी व्यावसाय केला आहे. कारण त्यांचे आयात शुल्क जगातील सर्वात जास्त आहे आणि त्यांच्याकडे सर्वात कठीण आणि त्रासदायक गैर आर्थिक व्यापार अडथळे आहेत. तसंच, त्यांनी त्यांचे बहुतांश लष्करी साहित्य रशियाकडून खरेदी केलं आहे.
ते रशियाच्या ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत. चीनसह ज्यावेळी सर्वजण रशियाला युक्रेनमधील हिंसा थांबवण्यास सांगत आहेत, हे सर्व काही चांगले नाही, त्यामुळे भारताला एक ऑगस्टपासून 25 टक्के आयात शुल्क तसंच वरील कारणासाठी दंड आकारला जाईल, याकडं लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद, असं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे.
US President Donald Trump on Truth Social, posts, "Remember, while India is our friend, we have, over the years, done relatively little business with them because their Tariffs are far too high, among the highest in the World, and they have the most strenuous and obnoxious… pic.twitter.com/vAN7zztl66
— Press Trust of India (@PTI_News) July 30, 2025