Video : भारत माझा मित्र, माझ्या विनंतीवरुन युद्ध थांबवलं, ट्रम्प यांचा पुन्हा दावा

Video : भारत माझा मित्र, माझ्या विनंतीवरुन युद्ध थांबवलं, ट्रम्प यांचा पुन्हा दावा

Donald Trump On Operation Sindoor : माझ्या विनंतीवरुन युद्ध थांबवलं असा दावा पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केल्याने विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) सुरु असणाऱ्या चर्चेदरम्यान जगातील कोणत्याही नेत्याने ऑपरेशन सिंदूर बंद करण्यास सांगितले नाही असं म्हटले होते मात्र आता पुन्हा ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान माझ्या विनंतीनंतर युद्ध थांबला असा दावा केल्याने विरोधक जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे.

एका प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प म्हणाले की, भारत माझा मित्र आहे, परंतु खूप कर आकारतो, मला वाटते की भारताला आता जास्त कर भरावा लागेल. भारत माझा मित्र असून माझ्या आहवानावर भारताने पाकिस्तानसोबचे युद्ध थांबवले. परंतु भारत जगातील जवळपास प्रत्येक देशापेक्षा अमेरिकेकडून जास्त कर आकारत आहे. मात्र आता मी जबाबदारी घेतली आहे आणि आता हे सर्व संपेल. असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. तसेच भारतावर आता 25 टक्के टॅरिफ लागणार असल्याचे सूचक विधान देखील ट्रम्प यांनी केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

ऑपरेशन सिंदूरवर सुरु असणाऱ्या चर्चेदरम्यान लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलत आहे हे पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सांगावे असा आव्हान केला होता यावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी जगातील कोणत्याही नेत्याने ऑपरेशन सिंदूर बंद करण्यास सांगितले नाही असा दावा केला होता.

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राज्य सरकारला मोठा झटका; आंबेडकर यांची पोस्ट करत माहिती

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, जगातील कोणत्याही नेत्याने ऑपरेशन सिंदूर बंद करण्यास सांगितले नाही. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी मला फोनवर सांगितले की पाकिस्तान मोठा हल्ला करणार आहे आणि माझे उत्तर असे होते की जर हा पाकिस्तानचा हेतू असेल तर ते त्यांना महागात पडेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube