Download App

दोन लग्न करणाऱ्या व्यक्तीबाबत अनोखा तोडगा, प्रत्येकीला 3-3 दिवस द्यावे लागणार

इंदौर : नवऱ्याने दुसरं लग्न केल्याने न्यायालयाबाहेर अनोखा तोडगा निघाला आहे. आठवड्यातील तीन दिवस एका पत्नीसोबत आणि तीन दिवस दुसऱ्या पत्नीसोबत पतीला रहावे लागणार आहे. तर रविवारी या एका दिवशी नवरा त्यांच्या इच्छेनूसार राहू शकणार आहे.

चित्रपटात घडतं अगदी तशीच घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडलीय. एक सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने एक पत्नी असताना दुसरी लग्न केलं. दुसऱ्या लग्नाची भनक लागताच पहिल्या पत्नीने थेट कौटुंबिक न्यायालयात धाव घेत न्याय मागितला.

WTC Final : ओवलचे मैदान भारतासाठी किती लाभदायक?

हा पती गुरुग्राममधील एका कंपनीत इंजिनिअर आहे. 28 वर्षीय पहिली पत्नी आणि पतीचे लग्न 2018 साली झालं. लग्नानंतर त्यांना एक मुलगाही झाला. त्यानंतर 2020 मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन पडल्याने त्याने पत्नीला माहेरी पाठवलं होतं. आणि पती गुरुग्राममध्ये आपली नोकरी करीत असे.

ज्या कंपनीत पती नोकरी करतो त्याच ठिकाणी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीशी त्याचं प्रेम जडलं. अन् मग दोघांनीही लग्न केलं. लग्नानंतर दुसऱ्या पत्नीलाही एक मुलगी झाली. दरम्यानच्या काळात आपला पती घेण्यासाठी येत का नाही? असा सवाल पहिल्या पत्नीला पडल्याने तिने थेट गुरुग्रामची बस धरत नवऱ्याचं ऑफिस गाठलं.

जीवे मारण्याच्या धमक्या, तानाजी सावंत यांचं ऑफिस जाळलं गेलं; शिंदे गटाकडून युक्तिवाद

तिथं गेल्यानंतर पत्नीला समजले की आपल्या पत्नीने दुसरे लग्न केलं असून त्यांना एक मुलगीही झाली आहे. संतप्त पहिल्या पत्नीने थेट कौटुंबिक न्यायालयात धाव घेत न्याय मागितला.

‘Rahul Gandhi माफी मागा’, दोन्ही सभागृह तहकूब

एकूण सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक हरीश दिवाण यांनी महिलेचं या प्रकरणी समुदेशन केले. पहिल्या पत्नीला अन् मुलासाठी फक्त 7 ते 8 हजार रुपये मिळतील, त्यानंतर पत्नी आणि मुलाचा काहीच फायदा होणार ऩसल्याचं समुपदेशकाने सांगितलं. समुपदेशकाने महिलेच्या पतीशी फोनवर चर्चा केली. पतीलाही त्यांनी समजावून सांगितले.

त्यानंतर समझोता करीत आठवड्यातील तीन दिवस एका पत्नीसोबत आणि उर्वरीत तीन दिवस दुसऱ्या पत्नीसोबत पतीला रहावं लागणार आहे. रविवारी मात्र, पतीची जशी इच्छा असेल त्यानूसार तो राहू शकणार असल्याचं सांगितलं आहे.

follow us