AAP MP Swati Maliwal serious allegations on Kejariwal and PA : एकीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( CM Arvind Kejariwal ) यांना दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यात आता त्यांच्या पुढे आणखी एक समस्या उभी ठाकली आहे. ही समस्या म्हणजे आपच्याच खासदार असलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल ( Swati Maliwal ) यांनी केजरीवाल यांच्यासह पीएवर गंभीर आरोप ( serious alligations ) केले आहेत. केजरीवालांच्याच सांगण्यावरून त्यांच्या पीएने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
BIG BREAKING NEWS 🚨 AAP Rajya Sabha MP Swati Maliwal claims Arvind Kejriwal's PA assaulted her at Kejriwal's residence.
PCR call was made at around 10 am from CM’s residence by Maliwal.
Following the call, Delhi Police reached the Chief Minister’s residence.
"Swati Maliwal… pic.twitter.com/LxtlIkfh3s
— Times Algebra (@TimesAlgebraIND) May 13, 2024
काय आहे नेमकं प्रकरण?
आपच्याच खासदार असलेल्या स्वाती मालीवाल यांच्या नावे आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास दिल्ली पोलिसांना एक फोन आला. त्यावर मालीवाल बोलत असल्याचं समोरच्या व्यक्तीने सांगितलं. तसेच सांगण्यात आलं की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी केजरीवालांच्याच सांगण्यावरून त्यांच्या पीएने आपल्याला मारहाण केली. बिभव कुमार असं या पीएचं नाव आहे.
उद्धव ठाकरे मविआचे CM पदाचे उमेदवार? सूचक विधान करत म्हणाले, मी महाराष्ट्र…
दिल्ली पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली. मात्र ही फोन करणारी व्यक्ती खरंच स्वाती मालीवाल होत्या का? याचा तपास सध्या दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी याबाबत मालीवाल यांची भेट घेतली असता. त्यांनी मारहाण झाल्याचं सांगितलं आहे. मात्र त्यांनी याबाबत वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला आहे. तसेच आपण याबाबत लेखी तक्रार देऊ असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान या प्रकरणी भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजप नेते कपिल मिश्रा यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहीलं की, ज्या केजरीवालांच्या घरात महिला आयोगाच्या अध्यक्ष सुरक्षित नाहीत. हा प्रकार नेमका काय आहे? यावर केजरीवाल्यांनी उत्तर द्यावं. तसेच केजरीवाल्यांच्या घरी स्वाती यांना पोलिसांना का बोलवावं लागलं? खरंच अशा प्रकारे मारहाण झाली आहे का? यावर मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्टीकरण द्यावे. अशी देखील मागणी त्यांनी केली.