Arvind Kejriwal तुरूंगात वाचू इच्छित असलेले ‘हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाइड’ पुस्तकात नेमकं काय?

Arvind Kejriwal तुरूंगात वाचू इच्छित असलेले ‘हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाइड’ पुस्तकात नेमकं काय?

Arvind Kejriwal : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने ( Rouse Avenue Court) त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र आता केजरीवाल यांनी तुरूंगात रामायण, महाभारत, गीता आणि पत्रकार निरजा चौधरी त्यांनी लिहिलेले हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड ( how prime minister deicide ) हे पुस्तक वाचण्यासाठी मागवली आहेत. चौधरींच्या पुस्तकांमध्ये पंतप्रधान कसे निर्णय घेतात याबाबत लिहिण्यात आलं आहे.

The Sabarmati Report साठी नेटिझन्सकडून राशी खन्नावर कौतुकाचा वर्षाव

त्याचबरोबर केजरीवालांनी तुरुंगामध्ये औषधांची मागणी केली आहे. 15 एप्रिलपर्यंत नारायण कोठडी अंतर्गत तिहार जेलमध्ये राहणार आहेत. तसेच यावेळी केजरीवालांनी पंतप्रधान मोदींवर टीका देखील केली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीचे काही करत आहेत. ते देशासाठी चांगलं नाही. तर त्यांनी मागणी केलेली तीन पुस्तकांसंदर्भात न्यायालयाने अद्याप परवानगी दिलेली नाही.

‘हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाइड’ पुस्तकात नेमकं काय?

‘हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाइड’ या पुस्तकामध्ये देशाच्या सहा पंतप्रधानांनी घेतलेल्या मोठ्या निर्णयांवर लिहिण्यात आलं आहे. त्यामध्ये पंतप्रधान यांची मानसिक स्थिती यावर जास्त प्रकाश टाकण्यात आला आहे. त्या पुस्तकामध्ये 1980 ते 2014 च्या दरम्यान असलेल्या पंतप्रधानांचे सहा मोठे निर्णय जे राबवतानाची त्यांची कार्यशैली यावर विश्लेषण करण्यात आलं आहे.

Dunk साठी तुषार कपूर सज्ज; पहिल्यांदाच सकारणार आगळी-वेगळी भूमिका

त्यामुळे आता ही पुस्तक वाचून केजरीवाल ‘हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाइड’ या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आलेल्या पंतप्रधान आणि त्यांच्या निर्णयांची भाजपच सरकार आल्यावर पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयांची तुलना करून सरकारवर टीकास्त्र साधणार एवढं नक्की मात्र ही पुस्तक तुरूंगात त्यांना मिळणार का? न्यायालया तशी परवानगी देणार का? हे पाहणं महत्त्वायचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube