अन् माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीला कराडचा जेलमधून फोन आला; अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट

Ambadas danve on Valmik Karad for phone call from jail with sopport of Dhananjay Munde : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंची क्लीन चिट आणि वाल्मीक कराडकडे जेलमध्ये फोन आहे. त्याने माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीला त्याने फोन केला होता. हे कोणत्याही राजकीय पाठिंब्याशिवाय शक्य नाही. असा दावा दानवे यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे?
कृषी विभागात मोठा भ्रष्टाचार झालेलाच आहे. न्यायालयाने जरी क्लिन चीट दिली असली तरी तो घोटाळा आहेच. तसेच वाल्मीक कराड हा कोणाचा पाठिराखा आहे? हे फक्त परळी किंवा बीडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आजही वाल्मीक कराड जेलमधून वेगवेगळ्या गोष्टी करतो. जसे की फोन कॉल माझ्यासमोर बसलेल्या व्यक्तीला वाल्मीक कराडचा फोन आला होता. त्यामुळे वाल्मीक कराडला धनंजय मुंडेचा पाठिंबा आहे. हे लपून राहिलेले नाही. तसेच वाल्मीक कराडकडे जेलमध्ये फोन आहे. हे मी चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं. हे कोणत्याही राजकीय पाठिंब्याशिवाय शक्य नाही. त्यात धनंजय मुंडेंची मोठी भूमिका आहे.
बाळा बांगर यांचा गंभीर आरोप
दुसरीकडे महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास एसआयटी आणि सीआयडीमार्फत करण्यात यावा या मागणीसाठी परळी-अंबाजोगाई मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्व. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील सहभागी झाले होते. या आंदोलनात बाळा बांगर देखील होते. याचनवेळी त्यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले.
“सरकारमधील मंत्र्यांवर CM फडणवीस नाराज, अनेकांना डच्चू मिळणार?”, खा. सुळेंचा दावा
काय म्हणाले बाळा बांगर
या प्रकरणात मी काहीच बोलू नये यासाठी माझ्यावर दबाव येत होता. परंतु, या लोकांना माहिती नव्हतं की मी या प्रकरणातील जबाब दिला. आता मी घाबरणार नाही माघारही घेणार नाही. वाल्मिक कराडने परळीला कीड लावली. या प्रकरणात मी फरार होतो म्हणून मला बोलण्यास उशीर झाला. प्रशासनाने वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला अभय दिले असा आरोप बांगर यांनी केला.
शनिशिंगणापूर बोगस कर्मचारी भरती घोटाळा; सुनावणीला मुहूर्त मिळाला
कॉल रेकॉर्डिंग संदर्भात सध्या जी उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यावरही बांगर यांनी उपोषणाचा इशारा दिला. काल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती माझ्या पत्नीने सांगितले की ती रेकॉर्डिंग मी व्हायरल केलेली नाही. आता या रेकॉर्डिंग प्रकरणाचे सीडीआर काढावेत यासाठी मी पण उपोषणाला बसणार आहे असा इशारा बाळा बांगर यांनी यावेळी दिला. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आता मी पुढील महिन्यात पत्रकार परिषद घेणार आहे. महादेव मुंडे प्रकरणात वाल्मिक कराडची टोळी गजाआड झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मिसाळांच्या खरमरीत पत्राचा कॅबिनेट मंत्र्यांना घरचा ‘आहेर’; ‘पुणेरी’ बाणा दिसताच शिरसाट नरमले
वाल्मिक कराडच्या ‘त्या’ प्लॅनचा खुलासा
वाल्मिक कराडच्या प्लॅनबाबत बांगर यांनी धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या वाईटावर होता. मुंडेंना संपवून त्याला पोटनिवडणूक घ्यायची होती. धनंजय मुंडे यांचे स्वीय सहायक प्रशांत जोशी यांनाही मारण्याचा कट वाल्मिक कराडने रचला होता असा धक्कादायक आरोप बाळा बांगर यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.