“सरकारमधील मंत्र्यांवर CM फडणवीस नाराज, अनेकांना डच्चू मिळणार?”, खा. सुळेंचा दावा

“सरकारमधील मंत्र्यांवर CM फडणवीस नाराज, अनेकांना डच्चू मिळणार?”, खा. सुळेंचा दावा

Supriya Sule on CM Devendra Fadnavis Delhi Visit : महायुती सरकारमधील मंत्र्यांचे अनेक कारनामे सध्या बाहेर येत आहेत. त्यामुळे सरकारच्या कारभारावर प्रचंड टीका होत आहे. विरोधकांकडूनही या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे. या घडामोडी घडत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला गेले होते. येथे त्यांनी अनेकांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या या दौऱ्याचा तपशील बाहेर आलेला नसला तरी शरद पवार गटाच्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी (Supriya Sule) वेगळाच सूर आळवला आहे. मुख्यमंत्री त्यांच्या सरकारमधील मित्रपक्षांवर नाराज आहेत, असे सुळे म्हणाल्या आहेत.

सुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केली. तसेच राज्याच्या राजकारणात सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरुन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीत राज्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत मुख्यमंत्री तीन दिवस दिल्लीत होते. मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांकडून जे सुरू आहे त्यावर मुख्यमंत्री प्रचंड नाराज आहेत. मित्रपक्षांवर मुख्यमंत्री नाराज आहे. महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल अशी परिस्थिती सध्या आहे, अशी टीका सुळे यांनी केली.

Supriya Sule : “बडे लोग बडी बातें” हेलिकॉप्टरच्या फेऱ्यांवरुन हसन मुश्रीफांवर सुळेंचा हल्लाबोल

धनंजय मुंडे यांना एका प्रकरणात उच्च न्यायालयाने क्लिनचीट दिली आहे. त्यानंतर मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांनी (Ajit Pawar) देखील याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. या घडामोडींवरही सुळे यांनी भाष्य केले आहे. क्लिनचीट कसली देता लोकांची घर उद्धवस्त होत आहेत आणि तुम्ही कसली क्लीन चीट देत फिरताहेत अशा लोकांना आम्ही महाराष्ट्रात मंत्रिमंडळात येऊ देणार नाही असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.

कोकाटेंनी राजीनामा द्यावा

ज्यावेळेस पहिला व्हिडिओ समोर आला त्यावेळी माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता. यांना सांगावं लागतं की राजीनामे द्या स्वतः राजीनामे देत नाहीत. दिल्लीने मध्यस्थी केल्याशिवाय राजीनामे होत नाहीत महाराष्ट्राला न्याय कधी मिळणार, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला.

वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट

या दीडशे दिवसांत महाराष्ट्राची मोठी बदनामी झाली आहे. याचा जबाब या सरकारला द्यावा लागेल. वाल्मिक कराड जेलमधून फोनवर बोलत आहे. त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट सुरू आहे. आता आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आम्ही वेळ मागितली आहे. महाराष्ट्रातील दोन केससाठी कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे त्याबद्दल अमित शहांशी बोलणार आहोत तसेच महादेव मुंडे खून प्रकरणाबाबतही शाह यांची भेट घेणार आहोत. त्यांच्या भेटीची वेळ आम्ही मागितली आहे, असे सु्प्रिया सुळे यांनी सांगितले.

आमदार रोहित पवारांना पक्षात मोठी जबाबदारी; खासदार सुळेंनी केली घोषणा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube