आमदार रोहित पवारांना पक्षात मोठी जबाबदारी; खासदार सुळेंनी केली घोषणा

Rohit Pawar : शरदचंद्र पवार पक्षात काल मोठी खांदेपालट झाली. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मंगळवारी (१६ जुलै) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक्स मीडियावर पोस्ट करून रोहित पवार यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याची घोषणा केली आहे.
शाळेतील आसन व्यवस्थेत मोठा बदल; आता वर्गात कोणताच विद्यार्थी नसणार ‘बॅकबेंचर’
सुप्रिया सुळेंनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली. रोहित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होईल याची खात्री आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय पवार साहेब यांच्या विचारांचा वस्तुपाठ डोळ्यांसमोर ठेवून ते काम करीत आहेत, असं सुळेंनी म्हटलं.
नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली. रोहित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होईल याची खात्री आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब आणि… pic.twitter.com/RbNsYoAyoY
— Supriya Sule (@supriya_sule) July 16, 2025
पुढं खासदार सुळेंनी लिहिलं की, नूतन प्रांताध्यक्ष शशिकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याची शिव फुले शाहू आंबेडकर ही वैचारिक चौकट अधिक भक्कम करण्यासाठी ते सदैव कार्यरत राहतील हा विश्वास आहे. त्यांचे या नवीन जबाबदारीबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
मोठी बातमी, सीरिया लष्कराच्या मुख्यालयावर इस्रायलने केला बॉम्ब हल्ला; अनेकांचा मृत्यू
गेल्या काही काळापासून जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात शीतयुद्धाची चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमीवर, जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना रोहित पवारांना पक्षात कोणतीही ठोस जबाबदारी देण्यात आली नव्हती. मात्र, आता जयंत पाटलांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर, रोहित पवार यांची सरचिटणीसपदी निवड झाली.
दरम्यान, शरद पवार गटाचे अनेक नेते सध्या सत्ताधारी महायुतीत जात आहे. त्यामुळं शशिकांत शिंदे आणि रोहित पवारांपुढं पक्ष एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. हे आव्हान ते कसं पेलतात, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.