AAP Lok Sabha candidate Somnath Bharti : लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांवर आलाय. राजकीय विश्लेषकांसह माध्यमांनी आणि सर्व पक्षाच्या नेत्यांनी कोण विजयी होणार याबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले आहेत. (Lok Sabha) त्यातच आता (AAP) आम आदमी पार्टीचे उमेदवार सोमनाथ भारती यांनी मात्र एक्झिट पोलचा अंदाज खोटा ठरवला असून, मोठा दावा केला आहे. या एक्झिट पोलचा अंदाज खोटा ठरणार असून जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करून घेईन अशी घोषणा भारती यांनी केली आहे.
केजरीवालांना दिलासा नाहीच! आत्मसमर्पण करावंच लागणार
लोकसभा निवडणुकीचे मतदानाचे सातही टप्पे पार पडले आहेत. त्यानंतर आता सर्व वृत्तवाहिन्या आणि एजन्सीचे एक्झिट पोल जाहीर होत आहेत. यामध्ये सर्वच आपापले अंदाज व्यक्त करत आहेत. या एक्झिटपोलमध्ये एनडीएला बहुमत मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, आम आदमी पार्टीचे उमेदवार सोमनाथ भारती यांनी मात्र एक्झिट पोलचा अंदाज खोटा ठरणार असल्याचं म्हटल आहे. त्यांनी ट्विट करत हा दावा केला आहे.
लोक भाजपच्या विरोधात
माझे शब्द लिहून ठेवा. जर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी माझे मुंडन करून घेईन. चार जूनला सर्व एक्झिट पोल खोटे ठरणार असून मोदीजी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत. दिल्लीत इंडिया आघाडीला सातही जागा मिळणार आहेत. मोदींच्या भितीने एक्झिट पोल वाल्यांनी त्यांना हरताना दाखवलं नाही. त्यामुळे आपल्याला 4 जूनपर्यंत खरे आकडे समोर येईपर्यंत थांबावं लागणार आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणात भाजप विरोधात मतदान केलं आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
जनतेचा सर्व्हे इंडिया जिंकणार
इंडिया आघाडी किमान 295 जागा जिंकणार आहे. त्यापेक्षा कमी जागा येणार नाहीत. हा आमचा सर्व्हे नाही तर जनतेचाच सर्व्हे आहे. सरकारी सर्व्हे होतच असतात. त्यांच्याकडे आकडे लावण्याचे आणि बिघडवण्याचे तंत्र पहिल्यापासूनच आहे. त्यांचे माध्यमातील दोस्त आकडे रंगवून सांगतात. म्हणूनच सत्य काय? आहे आणि जनतेच्या मनात काय? हे मी तुम्हाला सांगत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे.