ब्रेकिंग: अभिजीत दिपकेची सुटका; दिल्ली पोलिसांना न्यायदंडाधिकाऱ्यांनी झापलं, नेमकं काय घडलं?

Abhijit Dipke Released: दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका करण्यत आली.

Abhijeet dipke ashutosh ranka, saurav dasReleased

Abhijeet dipke ashutosh ranka, saurav dasReleased

Abhijeet dipke ashutosh ranka, saurav dasReleased: दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनासाठी आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि त्याचे सहकारी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी काल (10 ऑक्टोबर) विमानतळावरुनच ताब्यात घेतले होते. त्यांना कोठे ठेवण्यात आलं होतं याबाबतही कोणाला माहिती देण्यात आली नव्हती. मात्र आता या तिघांची सुटका करण्याचे आदेश कार्यकारी न्याय दंडाधिकारी यांनी दिलेत. त्यामुळे या तिघांसह सीजेपी आंदोलकांना दिलासा मिळाला आहे.

 

नेमकं काय घडलं होतं

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर सवाल करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी अभिजीत दिपके यांनी 10 ऑक्टोबरला दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार अनेक आंदोलक दिल्लीत दाखल झाले. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. कारण पोलिसांच्या मते सीजेपीच्या आंदोलनाला परवाणगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झालेल्या अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी विमानतळावर विमानात शिरुन ताब्यात घेतलं.

‘मोगॅम्बो मोदी लोकशाही उद्ध्वस्त करतायत, आपण मिळून मोदींचा पराभव करू’, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

आज या तिघांना कार्यकारी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आलं. अभिजीत दिपकेच्या वकिलांनी न्यायदंडाधिकारी आपली बाजू मांजली. दिपके आणि त्यांचे सहकारी हे आंदोलनस्थळी गेलेच नव्हते. असा युक्तिवाद वकिलांनी केला. त्यानंतर या तिघांवरील कारवाईबाबत दिल्ली पोलिसांना प्रश्न विचारण्यात आले. या तिघांकडून कोणते कृत्य घडले की, त्यांना विमानात जाऊन ताब्यात घ्यावं लागलं?

दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, जंतर-मंतरवर सीजेपीचा पुन्हा आंदोलनाचा निर्धार, आज काय घडणार?

दरम्यान, अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची पुढील एक वर्ष शांतता भंग न करण्याच्या अटीवर सुटका करण्यात आल्याची माहिती आहे. आता आंदोलनाची पुढची दिशा काय ठरते याकडे लक्ष लागले आहे.

Exit mobile version