Abu Salem release plea : मुंबईचा कुख्यात गॅंगस्टर अबू सालेम (Abu Salem) याला सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा झटका दिला आहे. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट आणि बांधकाम व्यवसायिक प्रदिप जैन यांच्या हत्येतील आरोपी अबू सालेम याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतू 25 वर्षांचा कारवास पुर्ण झाल्यानंतर त्याला सोडून देण्यात येईल, असे आश्वासन भारत सरकारने पोर्तुगाल सरकारला दिले होते. याचा आधार घेत त्याने सुटकेची मागणी करणारी याचिका केली होती. पण आज (10 सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली आहे.
राजकीय भांडणं करत राहू, पण… राऊतांनी पहिल्यांदा थोपटली सरनाईकांची पाठ…
1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण 2005 मध्ये पोर्तुगालहून त्याला भारतात परत आणताना भारत सरकारने पोर्तुगाल सरकारला आश्वासन दिले होते की, 25 वर्षांच्या शिक्षेनंतर अबू सालेमला सोडून देण्यात येईल. त्यानुसार 2030 पर्यंत त्याला सोडण्यात यावे, असे न्यायालयानेही मान्य केले.
भारत, पाकिस्तान की अमेरिका, ‘या’ देशात सर्वात स्वस्त मिळतोय iPhone 18 Pro Max
मात्र 31 मार्च 2025 रोजी 25 वर्षांची शिक्षा पुर्ण झाली, असा दावा अबू सालेमने केला. अंडर ट्रायल काळ आणि दोषसिद्धीनंतरचा कारावास आणि चांगल्या वर्तवणुकीसाठीची रिमिशन मोजल्यास 31 मार्च 2025 रोजी शिक्षेला 25 वर्ष पुर्ण झाली, असा दावा अबू सालेमने केला होता.
Video : आता मला आठवा रेकॉर्ड करायचाय; गडकरींनी सर्वांसमोर सांगितलं पुढचं टार्गेट…
पण अंडर ट्रायल काळ आणि दोषसिद्धीनंतरचा कारावास आणि चांगल्या वर्तवणुकीसाठीची रिमिशन ही या 25 वर्षांच्या शिक्षेत मोजता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. परिणामी सर्वोच्च न्यायालयाने अबू सालेमची सुटकेची मागणी करणारी याचिका फेटाळली. आता अबू सालेम सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात आहे.
