देशाच्या पुढील पंतप्रधानपदासाठी (PM) कोणता नेता सर्वाधिक योग्य आहे, याबाबतच्या सर्वेक्षणात नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक पसंती मिळाल्याचं समोर आलं आहे. India Today च्या Mood of the Nation Poll नुसार, 49% लोकांनी नरेंद्र मोदी यांना पुढील पंतप्रधानपदासाठी पसंती दिली आहे.
या सर्वेक्षणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 27% लोकांनी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे मोदींनंतर पुढील पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी हे सर्वाधिक पसंतीचे नेते ठरले आहेत. मात्र, मोदी आणि राहुल गांधी यांच्या पसंतीच्या टक्केवारीत मोठी तफावत असल्याचं दिसून येत आहे. तर, अभिनेता आणि राजकारणी Joseph Vijay यांना 9% लोकांनी पुढील पंतप्रधानपदासाठी योग्य मानलं आहे. तर Abhijit Dipke आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांना प्रत्येकी 1% पसंती मिळाली आहे.
रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरून अभिनेत्री ट्रोल, क्रिती सेननच सडोतोड उत्तर, राहुल गांधींचीही मिळाली साथ
या आकडेवारीवरून पंतप्रधानपदाच्या पसंतीमध्ये नरेंद्र मोदी सध्या स्पष्ट आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. राहुल गांधी दुसऱ्या स्थानावर असले तरी मोदींच्या तुलनेत त्यांच्या पसंतीची टक्केवारी जवळपास निम्मी आहे. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
टीव्हीकेच्या मंत्र्यांनी आधीपासूनच विजय यांना 2029 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून सादर करण्यास सुरुवात केली होती.
तमिळनाडूचे मानव संसाधन विकास मंत्री सरथकुमार यांनी 18 ऑगस्ट रोजी विधानसभेत बोलताना स्पष्टपणे म्हटलं होतं, आमच्या हृदयात आणि सेंट जॉर्ज फोर्टमध्ये मुख्यमंत्री असलेले आमचे नेते हेच देशाचे पुढील पंतप्रधान आहेत. तुम्ही रात्रंदिवस न पाहता काम करता, तुम्हीच भारताचे भवितव्य आहात असं ते म्हणाले होते.
