ACP Manish Vachishta : दिल्लीतील एसीपी मनिष वशिष्ठ यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता पोलिस कर्मचाऱ्यांसह मनिष वशिष्ठ यांनी दिल्लीत धरणे आंदोलन केलंय. या प्रकरणावर दिल्ली न्यायालयातील वकीलांनीही एकजुटीची मोट बांधून पोलिसांच्या गुंडागर्दीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मनिष वशिष्ठ बंदूकीचा धाक दाखवून वकीलांना घाबरवत असल्याचा गंभीर आरोप वकीलांकडून करण्यात आला आहे. एका माध्यमांशी बोलताना वकीलांनी एसीपी मनिष वशिष्ठ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पुढे बोलताना वकील म्हणाले, एसीपी मनिष वशिष्टने वकिलांना आपल्या चेंबरमध्ये बोलावलं होतं. सिव्हील ड्रेसमध्ये वशिष्ठने बंदूक टेबलावर ठेवत फोनवर बोलत होता. बंदूक दाखवून मनिष वकीलांना घाबरवत होता. या प्रकरणी मनिषचे ट्रान्सफर केले त्याविरोधात दिल्ली हायकोर्टातसमोर आंदोलन केलं. वकिलांना काळ्या कोटावाला गुंडा बोलले, वकिलांना एके 47 ने मारण्याची भाषा केली. आम्हा वकीलांचाही त्याला विरोध आहे. गृहमंत्रालयाकडून त्याच्यावर कारवाई झाल्याचं सांगितलं जात आहे. हा एसीपी वरिष्ठ अधिकारी आहे, दिल्ली पोलिस त्यांना प्रशिक्षण का देत नाहीत, सर्व सामान्य वकीलांसोबत कसं बोलायचं याची प्रशिक्षण द्यावं, याची गरज असल्याचं वकीलांनी स्पष्ट केलंय.
तसेच जेव्हा पोलिस सर्वसामान्यांची भाषा ऐकत नाहीत तेव्हा वकीलांना मध्यस्थी करावी लागते. वकील इंग्रजांनाही घाबरलेले नाहीत त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरार नाही याचा हिशोब होणारच. दिल्ली पोलिसांचं आंदोलन सुरु आहे तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना पगार टीए डीए मिळत नाही त्यावर त्यांनी आंदोलन करावं. दिल्ली पोलिसांना या प्रकरणी वकील मिळालेले आहेत. काळ्या कोटवाले फक्त वकील नसतात तर न्यायमूर्तीही असतात. गुंडागर्दीची भाषा नाही चालणार, लोकशाही पद्धतीनेच बोलंलं पाहिजे
पण नेता बनून तो आंदोलन करीत असल्याचीही टीका वकीलांनी केलीयं.
दरम्यान, दिल्ली पोलीस दलात एसीपी असलेल्या मनस्वी वशिष्ठ यांना निलंबित करण्यात आलंय. मनस्वी यांनी सोमवारी दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं. पोलीस आणि वकिलांमध्ये सुरू असलेल्या वादातून त्यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. ही बदली अन्यायकारक असून पोलीस आयुक्तांची भेट घ्यायची असल्याचं म्हणत त्यांनी आंदोलन केलं होतं.
