Download App

अभिनेत्री रविना टंडनचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मान…

90 च्या दशकात बॉलिवूड चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालणाऱ्या दिलवाले चित्रपटातील सपना अर्थात अभिनेत्री रविना टंडनला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते रविनाचा सन्मान करण्यात आला आहे.

आ देखे जरा किसमे…सुषमा अंधारेंचं बावनकुळेंना खुलं चॅलेंज…

रविना टंडन यांच्यासोबत ‘नाटू नाटू’ गाण्याचे संगीतकार एम.ए.कीरवाणी यांना देखील पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी रविना टंडनचा सन्मान करण्यात आला आहे. रविनाने ‘मोहरा’,’दिलवाले’ ‘अंदाज अपना अपना’ तसेच ‘सत्ता’ आणि ‘दमन’ सारख्या सुपरहिट चित्रपटांसह अनेक चित्रपटांत मुख्य भूमिका साकारलेली आहे.

P. N. Patil : आमदार स्वतःहून चौकशीसाठी ईडी समोर हजर; पण चौकशी झालीच नाही, काय आहे प्रकरण

त्यासोबतच रविना टंडनने महिला सक्षमीकरणासह बाल हक्कांसाठी सक्रिय होत कार्य केलं आहे. त्यासोबतच वंचित मुलांसाठी रविना टंडन फाऊंडेशनच्या त्या संस्थापक आहेत. हा पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, सामाजिक कार्यांसह विविध क्षेत्रांतील सेवेसाठी प्रदान केला जातो. पद्मश्री पुरस्कार हा रवीना टंडनसाठी एक मोठा सन्मान आहे.

दरम्यान, या वर्षासाठी राष्ट्रपतींनी 3 दुहेरी प्रकरणांसह 106 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली असून यामध्ये 6 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण आणि 91 पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून परदेशींच्या यादीत आणखी दोन जणांचा समावेश आहे.

Tags

follow us