Download App

Adani Group CFO म्हणतात, “अदानी ग्रुपकडे कर्जापेक्षा जास्त मालमत्ता”

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : मागील आठवड्यात अदानी ग्रुपवर हिंडेनबर्ग रिपोर्ट (Hindenburg Report) पब्लिश झाल्यांनतर अदानी ग्रुपला याचा मोठा फटका बसला. त्यानंतर काल अदानी ग्रुपकडून याला ऊत्तर दिले तब्बल ४१३ पानाचं उत्तर दिल आहे. त्यानंतर आज अदानी ग्रुपचे मुख्य वित्त अधिकारी CFO Jugeshinder Singh यांनी यांनी आज एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन अदानी ग्रुपवरच्या आरोपांना उत्तर दिले.

अदानी ग्रुपच्या सीएफओनी CFO Jugeshinder Singh सांगितले की, “कंपनीवर केलेल्या आरोपांमुळे जुन्या आणि मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एकही प्रभावित झाला नाही आणि गेल्या आठवड्यापासून ते कंपनीसोबतच आहेत.” याशिवाय अदानी ग्रुपने मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतल्याच्या मुद्द्यावर त्यांनी उत्तर दिले. यावर बोलताना ते म्हणाले की “हा मुद्दा निराधार आहे कारण अदानी समूहाकडे कर्जापेक्षा जास्त मालमत्ता आहे आणि याशिवाय अदानी समूहाने स्वतः बाजारात मोठ्या प्रमाणावर कर्ज दिले आहे.”

८८ पैकी ६८ प्रश्न खोटे

हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या रिपोर्टमध्ये ८८ प्रश्न विचारले होते. त्यापैकी ६८ खोटे आहेत. सिंग यांच्या मते अदानी ग्रुपने नफ्यासाठी कायम प्रयत्नशील आहे. गेल्या ४-५ वर्षांत कर्ज दुप्पट झाले आहे, पण या अहवालात मालमत्ता आणि व्यवसायाच्या वाढीबद्दल काहीही लिहले नाही. अदानी ग्रुप भारत सरकारनंतर देशातील सर्वाधिक पायाभूत सुविधा निर्माण करत आहे.

अदानी ग्रुपकडून शेल कंपन्यांच्या माध्यमातून स्टॉकमध्ये फेरफार केल्याच्या दाव्यावर सिंग यांनी उत्तर दिले की हे आरोप “खोटे” आहेत. “आमच्या प्रवर्तकांचे शेअरहोल्डिंग पूर्णपणे उघड आहे आणि काही शेअर्स परदेशात आहेत. पण आमच्या परदेशातील होल्डिंग पूर्णपणे उघड आहे.” ते पुढे म्हणाले की, “गेल्या १२ वर्षात पब्लिक डॉक्युमेंटमध्ये होल्डिंगचा पूर्णपणे खुलासा केला आहे. गुंतवणूकदारांसाठी, नियामकांसाठी, प्रत्येकासाठी आम्ही आमची माहिती समोर ठेवली आहे.”

Tags

follow us