Download App

मोठी बातमी! गौतम अदानींना अमेरिकेतील ‘त्या’ प्रकरणात ‘क्लीन चिट’; समूहाने केला मोठा खुलासा

नोव्हेंबर 2024मध्ये, अमेरिकन अधिकाऱ्यांनी गौतम अदानी, त्यांचा पुतण्या आणि कार्यकारी संचालक सागर अदानी आणि व्यवस्थापकीय

  • Written By: Last Updated:

Adani Green Gets Clean Chit : अदानी समूहाविरुद्ध अमेरिकेत सुरू असलेल्या (Adani) लाचखोरी प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे. अदानी ग्रुपने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेत अदानी समूहाविरुद्ध कोणतेही पुरावे आढळले नाहीत, असं अदानी समूहाने म्हटलं आहे. अदानी ग्रुपची कंपनी अदानी ग्रीनने याबद्दल माहिती दिली आहे.

गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन यांच्यावर अमेरिकेतील अधिकाऱ्यांना वीज उत्पादनांसाठी लाच दिल्याचा आरोप होता. अदानी समूहावर अधिकाऱ्यांना 236 दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप आहे. ज्यावर आता अदानी ग्रुपने म्हटले आहे की, या तपासात कोणतीही माहिती आढळली नाही.

पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी अंबानी सरसावले; केली मोफत उपचारांची घोषणा

नोव्हेंबर 2024मध्ये, अमेरिकन अधिकाऱ्यांनी गौतम अदानी, त्यांचा पुतण्या आणि कार्यकारी संचालक सागर अदानी आणि व्यवस्थापकीय संचालक विनीत एस जैन यांच्यावर भारतीय वीज करार मिळवण्यासाठी लाच दिल्याचा आणि निधी उभारताना अमेरिकन गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले होते आणि ते निराधार असल्याचे म्हटले होते.

अदानी समूहाने जानेवारीमध्ये या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी एका स्वतंत्र कायदा फर्मची नियुक्ती केली होती. कंपनीने आपल्या दाखल्यात म्हटले होते की, आम्ही आणि आमच्या भागीदार कंपन्या नियम आणि कायदे पाळत राहू असा निर्णय घेतला आहे. तसंच, आम्हाला आशा आहे की या आरोपांचा कंपनीवर फारसा परिणाम होणार नाही. दरम्यान, फेब्रुवारी 2025 मध्ये, अमेरिकन बाजार नियामकाने समूहावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांकडून सहकार्य मागितले होते.

विनीत जैन यांचा कार्यकाळ वाढवला

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन यांच्यावरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर अदानी ग्रीनने 10 जुलै रोजी त्यांची पाच वर्षांच्या कालावधीसाठी संचालकपदी पुन्हा नियुक्ती केली. कंपनीने म्हटले आहे की जैन यांनी त्यांच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी कंपनीला ऊर्जा क्षेत्रात नवीन उंचीवर नेले आहे.

follow us