Download App

Aditya-L1 Mission : इस्त्रोनं रचला नवा इतिहास! आदित्य एल-1 ने गाठलं आपलं लक्ष्य

Aditya-L1 Mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने (ISRO )आज शनिवारी अवकाशात नवा इतिहास रचला आहे. इस्त्रोच्या सूर्य मोहिमेवर पाठवलेल्या आदित्य एल-1 Aditya-L1 Mission ने आपलं लक्ष्य गाठलं आहे. इस्त्रोच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे. आदित्य एल-1 आपल्या इच्छितस्थळी अर्थात लॅंग्रेज पॉइंट-1 (L1)वर पोहोचून स्थिरावले आहे. आता आदित्य एल-1 हे दोन वर्ष याच ठिकाणी स्थिरावून सूर्याचा अभ्यास करणार आहे.

‘मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध’; CM शिंदेची ग्वाही

भारताची ही पहिली सूर्य अभ्यास मोहीम इस्त्रोनं 2 सप्टेंबर रोजी सुरू केली आहे. ते पाच महिन्यांनंतर म्हणजेच आज दि. 6 जानेवारी 2024 रोजी उपग्रह L1 पॉईंटवर पोहोचला. या पॉईंटभोवती सौर प्रभामंडल कक्षेत स्थापित केले आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोनं आणखी एक यश मिळवल्याचे पीएम मोदी म्हणाले. भारतातील पहिली सौर वेधशाळा आदित्य-L1 आपल्या इच्छितस्थळी पोहोचली आहे. आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाचा हा पुरावा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

Sharad Mohol : गँगस्टर शरद मोहोळचा धसका संजय दत्तनेही घेतला होता….

आदित्य एल-1 हे सूर्याचा अभ्यास करणाऱ्या नासाच्या इतर चार उपग्रहांमध्ये सहभागी झाले आहे. 37 लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आदित्य एल1 हॅलो ऑर्बिटवर पोहोचले. यानंतर आता पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर भारतातील पहिली सौर वेधशाळा स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर आता सूर्याच्या सर्वात वरच्या भागाचा अभ्यास करणार आहे.

सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य एल 1 ला सात प्रकारचे पेलोड बसवण्यात आले आहेत. त्यातील चार पेलोड हे सूर्याचा अभ्यास करणार आहेत तर उरलेले तीन पेलोड हे त्या ठिकाणच्या वातावरणाचा अभ्यास करणार आहेत. त्यात विशेष गोष्ट म्हणजे सूर्यग्रहण काळामध्येही सूर्याचा आणि त्याभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी काही अडचण येणार नसल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

follow us