Download App

चंद्रयान 3 च्या पाचपट पुढे जाणार आदित्य L1; तब्बल 14 कोटी 96 लाख किमी लांबून करणार सूर्याचा अभ्यास

भारताचे चांद्रयान 3 मिशन यशस्वी झाल्यानंतर आता सुर्याचा अभ्यास करण्यासाठी मोहीम आखण्यात आली असून याच्या तारखेचीही घोषणा करण्यात आली आहे. पहिले स्पेस बेस्ड इंडियन ऑब्जर्वेटरीशी संबंधित भारताचे सूर्य मिशन Aditya-L One 2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित केले जाणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी (28 ऑगस्ट) रोजी याबाबत ही माहिती दिली.

ISRO ने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार सकाळी 11.50 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून हे Aditya-L One लाँच केले जाईल. या लॉंचिंग पाहण्यासाठी इस्रोने जनतेलाही आमंत्रित केले आहे. इंडिया टाइमच्या रिपोर्टनुसार, आदित्य एल1 चे बजेट 378 कोटी रुपये आहे. मात्र, या सौर मोहिमेचा एकूण खर्च इस्रोने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेला नाही. (The launch of Aditya-L1, the first space-based Indian observatory to study the Sun is scheduled for 2 September)

आदित्य-L1 चा उद्देश काय आहे?

हे अंतराळ यान सूर्याच्या बाह्य स्तरांचे निरीक्षण करण्यासाठी आणि सूर्य-पृथ्वी लॅग्रेंज पॉईंट (L1) वर सौर वायुच्या स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. L1 पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे. सूर्याचे निरीक्षण करणारी ही पहिली भारतीय अंतराळ मोहीम असेल. आदित्य-L1 मोहिमेचे उद्दिष्ट L1 भोवतीच्या कक्षेतून सूर्याचा अभ्यास करणे हे आहे.

आदित्य L-1 सात पेलोड्स घेऊन जाणार असून हे वेगवेगळ्या वेव्ह बँडमध्ये फोटोस्फियर (फोटोस्फियर), क्रोमोस्फियर (सूर्याच्या दृश्य पृष्ठभागाच्या अगदी वर) आणि सूर्याच्या सर्वात बाहेरील थराचे निरीक्षण करणार आहे.

इस्रोच्या म्हणण्यानुसार, सूर्य-पृथ्वी लॅग्रेंज पॉईंटच्या L1 हेलो कक्षेजवळ अंतराळयान स्थापित करण्याची योजना आहे. L1 पॉईंट भोवती हेलो कक्षेत ठेवलेल्या उपग्रहाला कोणत्याही ग्रहणाशिवाय सूर्याला सतत पाहण्याचा मोठा फायदा मिळू शकतो. यामुळे रिअल-टाइममध्ये सौर हालचाली आणि अवकाशातील हवामानावर होणारे परिणाम समजून घेता येणार आहेत.

चंद्रयान 3 च्याही 5 पट पुढे जाणार आदित्य L1

सुर्य पृथ्वीपासून 15 कोटी 11 लाख किलोमीटर अंतरावर आहेत. तर L1 पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे. मात्र याच ठिकाणी आदित्य L1 ला पोहोचवणे हे इस्त्रोपुढे मोठे आव्हान असणार आहे. याचे कारण चंद्र पृथ्वीपासून तीन लाख किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे L1 हे अंतर चंद्राच्याही पाचपट आहे. 2019 मध्ये चंद्रयान 2 चा संपर्क तुटला होता.

त्यामुळे त्यापेक्षा पाच पट अंतरावर आदित्य L1 ला पोहचविणे आणि संवाद, संपर्क कायम ठेवणे हे इस्त्रोपुढील मोठे आव्हान असणार आहे. हे अंतर पार करायला आदित्यला 3 महिने किंवा 109 दिवस लागतील.अशी सूर्य मोहीम करणारा भारत हा चौथा देश ठरेल.

भारताची ऐतिहासिक कामगिरी :

भारतीय अंतराळ संस्था ISRO च्या शास्त्रज्ञांनी आजपर्यंत जगातील कोणताही देश न करू शकलेला पराक्रम करुन दाखविला आहे. चंद्राच्या सर्वात कठीण दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे (Chandrayaan-3) लँडिंग करण्यात इस्त्रोला (ISRO) यश आले आहे. दक्षिण ध्रुवावर अंतराळ यान पाठवणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. यानंतर आता भारताने सुर्याचे मिशन हाती घेतले आहे.

Tags

follow us