Download App

मोठी बातमी! गौतम गंभीर पाठोपाठ भाजपाला दुसरा धक्का, ज्येष्ठ नेत्याची राजकीय निवृत्ती

Jayant Sinha : एकीकडे भाजपमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांची इनकमिंग सुरु असताना दुसरीकडे पक्षातील दुसऱ्या मोठ्या नेत्याने राजकीय निवृत्ती घेतली आहे. हजारीबागचे खासदार जयंत सिन्हा (Jayant Sinha) यांनी निवडणुकीच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची मागणी पक्षाकडे केली आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आजच राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबत त्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांना राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. त्यापाठोपाठ खासदार जयंत सिन्हा यांनीही ट्विटमध्ये करत राजकीय निवृत्तीची मागणी पक्षाकडे केली आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की मी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना मला थेट निवडणुकीच्या कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. यामुळे मला भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलांच्या समस्येवर काम करता येणार आहे.

Gautam Gambhir : ‘राजकीय कर्तव्यातून मुक्त करा’, पहिली यादी येण्यापूर्वीच गौतमची ‘इलेक्शन रिटायरमेंट’

त्यांनी पुढं म्हटले की आर्थिक आणि प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांवर मी पक्षासोबत काम करत राहीन. गेली दहा वर्षे भारत आणि हजारीबागच्या जनतेची सेवा करण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे. याशिवाय, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप नेतृत्वाने दिलेल्या अनेक संधींच्या रुपाने आशीर्वाद मिळाला. त्या सर्वांचे माझे मनःपूर्वक आभार. जय हिंद.’

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूने थेट पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत; म्हणाली…

follow us