Mobile Recharges : आणखी एक धक्का; पेट्रोल-डिझेलनंतर मोबाईल रिचार्जही महाग होणार?

Mobile Recharges : देशभरात दिवसेंदिवस वाढ असणाऱ्या महागाईमुळे नागरिकांना अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. दूध, सीएजीनंतर देशात

Mobile Recharges

Mobile Recharges

Mobile Recharges : देशभरात दिवसेंदिवस वाढ असणाऱ्या महागाईमुळे नागरिकांना अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. दूध, सीएजीनंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 107 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहचल्याने आता नागरिकांच्या खिशावरील ताण वाढत चालला आहे. तर दुसरीकडे आता आणखी एक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलनंतर आता मोबाईल रिचार्ज देखील महाग होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel Price) वाढत्या किंमतीमुळे टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) रिचार्जमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतींचा परिणाम टेलिकॉम कंपन्यांवर होत असल्याने पुढील काही दिवसा मोबाईल रिचार्ज देखील महाग होणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.

रिपोर्ट्सनुसार, कोणत्याही मोबाईल टॉवर फूल ऑपरेटिंग करण्यात येणाऱ्या खर्चा पैकी जवळपास 40 टक्के खर्च फक्त वीज आणि इंधनावर होतो. पेट्रोल आणि डिझेल आता महाग झाल्याने टॉवर ऑपरेट करण्याच्या खर्चात देखील वाढ झाली असल्याने आता मोबाईल रिचार्ज (Mobile Recharges) महाग होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागत टॉवर ऑपरेट करण्यासाठी डिझेल जनरेटरवर जास्त अवलंबून राहावे लागत असल्याने इंधन किमतींचा कंपन्यांच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम दिसून येत असल्याचा दावा देखील या रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.

पार्थ पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला अन् पाऊण तास चर्चा; राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?-

तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी एका सभेत बोलताना पुढील एका वर्षासाठी सोने खरेदी टाळावी असे आवाहन केले होते. याचबरोबर इंधनाची देखील बचत करण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये प्रतिलिटर 3 रुपये वाढ करण्यात आली आहे. तर येणाऱ्या काही दिवसात या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये प्रति लिटर 10 रुपये वाढ करण्यात येणार असल्याचा दावा देखील मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.

Exit mobile version