Download App

Cow Hug Day : देशभरातील विरोधानंतर केंद्र सरकारचा ‘काऊ हग डे’ चा निर्णय मागे

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : 14 फेब्रुवारीला तरूणांसह नागरिकांकडून प्रमाचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेन्टाईन डे’ (Valentine day) साजरा करण्यात येत असतो. मात्र केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने (Animal Welfare Day) 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेन्टाईन डे’ ऐवजी ‘काऊ हग डे’ (Cow Hug Day) साजरा करण्याचं आवाहन केलं होत. मात्र आता अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने हा निर्णय घेतल्यानंतर सर्वच क्षेत्रातून त्याची खिल्ली उडवली गेली. सर्व स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या निर्णयाचं कौतुक केलं असून, काहींनी मात्र टीका केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांचाही समावेश आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरला एक व्हिडीओ ट्वीट करत टोला लगावला आहे.

हेही वाचा : BBC Documentary : सर्वोच्च न्यायालय म्हणतेय… आमचा वेळ वाया घालू नका… बंदी घालता येणार नाही!

काय होता ‘काऊ हग डे’ चा निर्णय ?
केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने ‘काऊ हग डे’ (Cow Hug Day) साजरा करण्याचं आवाहन केलं होत. 14 फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ साजरा करा अशी सूचना केंद्राने केली होता. गायींना अलिंगन द्या. तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा, असं आवाहन केंद्र सरकारने केलं होत. केंद्र सरकारच्या या निर्णयावरून शिवसेनेनेही भाजपची खिल्ली उडवली होती.

Tags

follow us