Download App

Sikkim Earthquake : तुर्कस्थानपाठोपाठ सिक्कीमच्या काही भागात भूकंपाचे धक्के

  • Written By: Last Updated:

तुर्कस्थानमध्ये झालेल्या भूकंपाची जगभर चर्चा असतानाच आज सकाळी सिक्कीमच्या (Sikkim Earthquake) काही भागात भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. पण भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची कोणतीही माहिती नाही. राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या माहितीनुसार पहाटे ४.१५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सिक्कीममधील युकसोमपासून 70 किमी ईशान्येला भूकंप झाला.

सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. गेल्या रविवारी आसामच्या काही भागातही भूकंपाचा धक्का जाणवला होता. या भूकंपामध्येही कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या अहवालानुसार दुपारी ४.१८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्याचा केंद्रबिंदू नागाव जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण तीरावर होता. भूकंपाचा केंद्रबिंदू भूपृष्ठापासून 10 किलोमीटर खोलीवर होता.

मीडिया रिपोर्टनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू गुवाहाटीपासून 160 किमी अंतरावर मध्य आसाममधील होजईजवळ होता. पश्चिम कार्बी आंगलाँग, कार्बी आंगलांग, गोलाघाट आणि मोरी गावातील लोकांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तरेकडील सोनितपूरमध्ये राहणाऱ्या लोकांनाही हा धक्का बसला. ईशान्येकडील सर्व राज्ये उच्च भूकंप प्रवण क्षेत्रात येतात आणि या भागात भूकंपाचे धक्के नियमितपणे जाणवतात.

Tags

follow us