Bride Runs Away With Gold Jewellery And Money In Agra : सकाळी लग्न ठरलं अन् दुपारी सप्तपदी झालं. संध्याकाळी मात्र नवरीनं धूम (Marriage Scam) ठोकलीय. 12 तासांच्या आतच नवरी पळून गेल्याचं समोर आलंय. या लग्नाची स्टोरी सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतेय. एका तरुणाचं मंदिरात लग्न झालं. दुपारी वधू-वरांनी देवा-ब्राम्हणाच्या साक्षीने सात फेरे घेतले. यानंतर, संध्याकाळी कुटुंबाला निरोप देण्याच्या बहाण्याने नवरी पळून (Viral) गेली.
नवऱ्या मुलाच्या कुटुंबियांनी वधूच्या मेहुण्याचा पाठलाग करून त्याला (Uttar Pradesh) पकडलंय. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. आता पोलीस वधूचा शोध घेत आहेत. पीडित तरूणाने सांगितलंय की, 15 दिवसांपूर्वी मोनूचं लग्न एका कानपूरच्या तरूणीशी ठरवलं होतं. नवऱ्या मुलीचं कुटूंब गरीब आहे, त्यामुळं मोनुला लग्नासाठी 35 हजार रूपये खर्च करावा लागेल, अशी अट ठेवण्यात आली होती. नवरदेवाने ती मान्य केली.
मजबुरीमुळे काँग्रेस ‘जय भीम’ चा नारा देत आहे अन् … PM मोदींचा राज्यसभेत हल्लाबोल
मध्यस्थांनी मुलीला भेटण्यासाठी बुधवारचा दिवस निश्चित केला होता. नवरदेव आणि त्याचं कुटुंब रामबाग येथील एका मंदिरात पोहोचलं. मुलीची बहीण आणि मेहुणा मनोज मध्यस्थासोबत (Viral News) आले. मोनुला मुलगी पसंत पडली, त्याने तिला सोन्याची अंगठी घातली. यानंतर, त्यांनी ब्राम्हणाला बोलावलं अन् सात फेरे घेतले. संध्याकाळी कुटुंबातील सदस्य घरी परतले. नवरीच्या बहिणीने घरी जाण्यासाठी ऑटो बोलावला. दरम्यान, नवरी तिच्या बहिणीला निरोप देण्याच्या बहाण्याने त्याच रिक्षात बसून पळून गेली. नवरदेवाच्या कुटुंबियांना संशय आल्यानंतर त्यांनी लगेचच दुसऱ्या रिक्षाने त्यांचा पाठलाग सुरू केला.
रस्त्यात त्यांनी या रिक्षाला गाठलं. तिच्यात मध्यस्थ आणि वधूचा मेहुणा मनोज सापडला. परंतु नवरी अन् तिची बहीण मात्र पळून गेलीय. लग्नाची व्यवस्था करण्यासाठी मध्यस्थ मोनूने 35 हजार रुपये दिले आहेत. वधूला दोन सोन्याच्या अंगठ्या आणि एक मंगळसूत्रही घालायला लावण्यात आले. मनोज आणि मोनूला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे. पोलीस नवरी आणि तिच्या बहिणीचा शोध घेत आहेत. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील आग्र्यामध्ये घडलीय.