VIDEO : श्रेयवादाची लढाई रंगली, मुख्यमंत्र्यांसमोरच अजित पवार अन् महेश लांडगे यांच्यात कलगीतुरा

VIDEO : श्रेयवादाची लढाई रंगली, मुख्यमंत्र्यांसमोरच अजित पवार अन् महेश लांडगे यांच्यात कलगीतुरा

Ajit Pawar Mahesh Landge Argument On demand Of Shivneri district : महायुतीतील श्रेयवाद चव्हाट्यावर आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी-चिंचवड येथील पोलीस आयुक्तालय भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त पुण्यात होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्यात ‘क्रेडिट वॉर’ झाल्याचं समोर आलंय. खरं तर पिंपरी-चिंचवडच्या विकासावरून सुरू झालेला हा वाद आता सत्ताधारी नेत्यांमध्ये वाढत्या तणावाचे संकेत देतोय.

Air Force Fighter Plane Crashes : मोठी बातमी! मध्य प्रदेशात हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले

पिंपरी-चिंचवड येथील पोलीस आयुक्तालय भूमिपूजन कार्यक्रम आज पार (demand Of Shivneri district) पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी देखील प्रस्तावित ‘शिवनेरी’ जिल्हाच्या मागणीवरुन अजित पवार-महेश लांडगे आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं.

भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी शिवनेरी जिल्हा तयार करण्याची जाहीर मागणी केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा विभाजनाला स्पष्ट नकार दिलाय, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने आमदार महेश लांडगे यांनी शहरभर ‘ब्रँडिंग’ केले आणि भाजपाला श्रेय घेतले. यावरुन देखील यावेळी वादाची ठिणगी पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं.

“आज नाही पण, उद्याची खात्री नाही”, भुजबळांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर वडेट्टीवारांचा खोचक टोला

आमदार महेश लांडगे यांची मागणी काय?
भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन होणार असेल, तर शिवनेरी जिल्हा करा अशी मागणी करा. तर पिंपरी-चिंचवडचा विकास 2014 नंतर महायुतीच्या काळात झाला, असा दावा देखील त्यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच पिंपरी-चिंचवड प्रगतीपथावर असल्याचं महेश लांडगे म्हणाले आहेत.

अजित पवार काय म्हणतात?
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, जिल्ह्यांचे विभाजन होणार, अशा बातम्यांमध्ये तथ्य नाही. जिल्हा विभाजन करणार नाही. पिंपरी-चिंचवडचा विकास मीसुद्धा केला. महेश लांडगे नाव घ्यायला का विसरले, हे माहिती नाही असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. काम करणाऱ्यांना श्रेय द्या. कंजुसपणा करू नका, मीसुद्धा 1992 पासून पिंपरी-चिंचवडचा विकास केलाय, असं अजित पवार म्हणालेत. चांगलं काम करणाऱ्यांना चांगलं म्हणा, असा शा‍ब्दिक टोला अजित पवारांनी महेश लांडगेंना लगावला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube