Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाल्यानंतर सगळीकडे गोंधळाचे आणि घबराहटीचे वातावरण पसरले आहे. या सर्वामध्ये नेमक्या किती प्रवाशांचा मृत्यू झाला आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र, ज्या इमारतीला हे विमान धडकले ती इमारत गुजरातमधील आघाडीचे वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या मुलांचे वसतिगृह होते. त्यामुळे विमानातील प्रवाशांसह या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विमानात सर्वात सुरक्षित सीट कोणती? कसं केलं जातं रेस्क्यू; जाणून घ्या सर्वकाही
घटनेवेळी मेडिकलचे विद्यार्थी करत होते जेवण
विमानाचा अपघात झाला ते ठिकाणी BJ मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थांचे वसतिगृह आणि मेसची इमारत होती. ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी दुपारच्या जेवणाची वेळ होती. त्यामुळे अनेक मेडिकलचे शिक्षण घेणारे विद्यार्थी जेवणासाठी मेसमध्ये आले होते. त्याचवेळी हे विमान कोसळून अपघात झाला. त्यामुळे यात अनेक विद्यार्थांचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार यात 20 विद्यार्थांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर, विमानातील 110 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
What Is Mayday Call: अहमदाबादमध्ये विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटने कोणाला फोन केला होता?
हेल्पलाइन नंबर जारी
अपघातग्रस्त विमानात एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, बोईंग ७८७-८ ने दुपारी १:३८ वाजता उड्डाण केले. त्यात २४२ प्रवासी होते, त्यापैकी १२ क्रू मेंबर्स होते, उर्वरित २३० प्रवाशांपैकी बहुतेक १६९ भारतीय होते. ५३ ब्रिटिश नागरिक होते, १ प्रवासी कॅनडाचा होता आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते.
Helpline activated for AI171 crash in Ahmedabad Airport: 9974111327
For any assistance or information, please reach out. We are doing everything possible to support affected families.@MoCA_GoI
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 12, 2025
या भीषण अपघातानंतर ब्रिटिश सरकारने प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. युके भारतातील स्थानिक अधिकाऱ्यांसोबत काम करत असून, ज्या ब्रिटिश नागरिकांना कॉन्सुलर मदतीची आवश्यकता आहे किंवा काही माहिती हवी असल्यास त्यांनी 1800 5691 444, 011-24610843 आणि 9650391859, 9974111327 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन नातेवाईकांना करण्यात आले आहे.
Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचे पायलट सुमीत सरभवाल कोण होते?
एअर इंडियाचे विमान कसं कोसळले?
फ्लाइट एआय 171 अहमदाबादहून लंडनला जात होती. अहमदाबाद हॉर्स कॅम्पजवळ हा अपघात झाला. विमानात क्रू मेंबर्ससह 242 प्रवासी होते. एअर इंडियाचे विमान टेक-ऑफ दरम्यान कोसळले. बोईंग विमानाने आधी पेट घेतला आणि नंतर कोसळलं. विमानाचा मागचा भाग झाडाला धडकल्याने अपघात झाला असल्याचं बोललं जातंय, तर दुसरीकडे विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचं देखील सांगितलं जातंय.
जरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. 242 प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान 700 फुटांवरुन मेघानीनगर ह्या नागरी वस्तीतच कोसळलं आहे.#Gujarat #FLIGHT #AirIndia #planecrash pic.twitter.com/EAg8tpUqRh
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 12, 2025