अहमदाबाद विमान अपघात घडला की घडवला?, विमान सुरक्षा तज्ज्ञ मोहन रंगनाथन यांची थेट उत्तरं

Mohan RanganathanOn Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये नुकताच एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात २४१ जणांना जीव गमवावा लागला. या घटनेचा सध्या सर्व स्तरावर तपास सुरू आहे. (Plane) अशातच आघाडीचे विमान सुरक्षा तज्ज्ञ कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी काही प्रश्नांची उत्तर दिली आहेत. एअर इंडिया फ्लाइट १७१ चा अपघात हा जाणीवपूर्वक मानवी कृतीचा परिणाम असू शकतो असं ते म्हणाले आहेत.
भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञांपैकी एक असलेले कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी फ्युएल कटऑफ स्विचेस आणि कॉकपिट ऑडिओच्या क्रमाकडं यावेळी लक्ष वेधलं वेधल आहे. ते म्हणतात, हा अपघात कॉकपिटमध्ये जाणीवपूर्वक केलेल्या कृतींमुळे झाला असावा. त्यांच्या या म्हणण्यामुळं मोठी शंकास्पद स्थिती निर्माण झाली आहे.
मोठी बातमी! भारतीय लष्कराचा म्यानमार सीमेवर हल्ला, बंदी घातलेल्या उल्फा (आय)चा मोठा दावा
यावेळी कॅप्टन रंगनाथन यांनी अहमदाबाद विमान अपघातावर भाष्य करताना, हा अपघात मानवी चुकीमुळे किंवा जाणीवपूर्वक केलेल्या कृतीमुळे होण्याची शक्यता वर्तवत यामध्ये आहे, सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचंही म्हटलं आहे. तसंच त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष आणि कठोर चौकशी करण्याची मागणी केली आहे.
प्रश्न : एखाद्या वैमानिकाने जाणूनबुजून फ्युएल बंद केले असावे का?
उत्तर : अगदी नक्कीच.
प्रश्न : हे मॅन्युअली करावे लागते का?
उत्तर : फ्युएल सिलेक्टर्स स्लायडिंग प्रकारचे नसल्यामुळे, ते आपोआप किंवा वीज खंडित झाल्यामुळे बंद होऊ शकत नाहीत. हे सिलेक्टर्स अशा प्रकारे डिझाइन केलेले आहेत की ते एका निश्चित स्लॉटमध्ये राहतात आणि त्यांना वर किंवा खाली हलवण्यासाठी प्रथम बाहेर खेचावे लागते. त्यामुळे ते आपोआप बंद होण्याची शक्यता नसते. त्यामुळे हे निश्चितपणे जाणीवपूर्वक, हाताने बंद केले असण्याची शक्यता आहे.
प्रश्न : इंधन नियंत्रण स्विच कोण करत?
उत्तर : इंधन नियंत्रण स्विच चुकू शकत नाहीत आणि ते अशा प्रकारे डिझाइन केलेले आहेत की फक्त वैमानिकच ते बंद करू शकतात.
इंधन नियंत्रण स्वतःहून स्विच होत?
उत्तर : इंधन नियंत्रण स्वतःहून किंवा वीज खंडित झाल्यामुळे होऊ शकत नाही, कारण इंधन नियंत्रण स्विच स्लाइडिंग प्रकारचा नाही. ते स्लॉटमध्ये राहण्यासाठी डिझाइन केलेले आहेत आणि त्यांना वर किंवा खाली हलविण्यासाठी तुम्हाला ते बाहेर काढावे लागतात. म्हणून, अनवधानाने ते ‘बंद’ स्थितीत हलवण्याची शक्यता कमी आहे.