Download App

मला कुणी विरोधक नाही; असं का म्हणाले नगरचे खासदार? पाहा लेट्सअप मराठीवर बेधडक निलेश लंके

अहमदनगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिली.

  • Written By: Last Updated:

MP Nilesh Lanke Exclusive on Letsup Marathi : आता मला कुणी विरोधक नाही. विरोधक हा फक्त निवडणुकांपुरताच असतो. मी आता अहमदनगर जिल्ह्याचा खासदार म्हणून कुटुंब प्रमुख आहे. विरोधक म्हणून आम्ही एकमेकांविरोधात निवडणूक लढवली. निवडणुकांच्या काळात त्यांनी माझ्यावर टीका केली मी त्यांच्यावर टीका केली. (Ahmednagar) त्यानंतर मात्र, बंद झालं पाहिजे. कारण लोकांनी मला काम करण्यासाठी निवडून दिलं आहे. (Nilesh Lanke) ते मला काय म्हणाले आणि मग मी त्यांना काही म्हणावं असं काही करायचं नाही अशी असं म्हणत मला आता कुणी विरोध नाही अशी थेट भूमिका अहमदनगर जिल्ह्याचे नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके यांनी मांडली. लेट्सअप मराठीच्या लेट्सअप चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते.

कुणी विरोधक नाही आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; अर्थमंत्री सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार

क्रिकेटच्या खेळात जस कळत नाही की या चेंडूवर काय मारणार आहोत तस निवडणुकीत तसं काह ठरून नसत. तसंच, निवडणुकीत वार-पलटवार असतो. त्यामुळे या गोष्टी मागे सोडून आता जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करणार आहे. त्यामुळे माझ्या नजरेत मी कुणालाच विरोधक म्हणून पाहणार नाही. कारण मी सर्वांचा लोकप्रतिनिधी आहे. ज्यावेळी निवडणूक लागेल त्यावेळी मी एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार. मात्र, इतरवेळी कुणाला विरोध समजून काम करणार नाही असं मतही लंके यांनी यावेळी व्यक्त केलं. तसंच, त्यांनी माजी खासदार सुजय विखे यांच्यावर थेट बोलण यावेळी टाळलं.

लोकांचा विचार केला सुप्रीम कोर्टात आज NEET प्रकरणी सुनावणी; चाळीसपेक्षा जास्त याचिकांवर अंतिम निर्णयाची शक्यता

आज मी आमदार म्हणून मला मुंबईत रूम मिळाली होती. मात्र, त्याचा मला नाही तर माझ्या मतदारसंघातील लोकांना उपयोग झाला पाहिजे या भावनेने मी वागलो. कारण आज ग्रामीण भागातून अनोक लोक मुंबईत येतात. काही काम असतात. तरुण परिक्षेसाठी येतात. त्यांना राहण्याची सोय नसते. त्या सर्वांना सोय व्हावी म्हणून त्या रुमचा वापर झाला अशी भावना निलेश लंके यांनी यावेळी व्यक्त केली. तसंच, तुम्ही खासदार झालात. मात्र, विधानसभेनतंर महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर लंके मोठ्या पदावर असते. मात्र, हे फेटाळत ज्याच्या खानदानात ग्रामपंचायत सदस्य झाला नाही तो माणूस खासदार झालाय यापेक्षा काय पाहिजे असं म्हणत आपल्याला जे मिळालय ते खूप आहे असंही लंके यावेळी म्हणाले.

पारनेर विधानसभेला कोण?

मीच निलेश लंके याला शरद पवार यांच्या गटात पाठवलं असं अजित पवार म्हणाले आहेत असं विचारंल असता निलेश लंके यांनी यावर उत्तर देण टाळलं. त्यांना आपण उत्तर दिलं नाही तर लोकांना अजित पवार बोलले ते खरं वाटेल असं विचारलं असता लोक अर्थच काढत असतात असं म्हणत आपण मोठ्या नेत्यावर काही बोलू नये असं म्हणत त्यांनी यावर जास्त बोलण टाळलं. तसंच, आता पारनेर विधानसभेला आपल्या पत्नी उमेदवार असतील असा प्रश्न विचारला असता ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल असं उत्तर देत त्यावरही जास्त बोलण लंके यांनी यावेळी टाळलं.

follow us