Download App

पुढील आठवड्यात PM मोदी अमेरिका दौऱ्यावर, डोनाल्ड ट्रम्प यांना कधी भेटणार?

PM Modi US France Visit Meet Donald Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) पुढील आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भेट घेणार आहेत. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सच्या दौऱ्यावर आहे. मोदी फ्रान्समध्ये होणाऱ्या एआय शिखर परिषदेचे सह-अध्यक्षत्व करणार आहेत. यामध्ये अमेरिकेचे (America) उपराष्ट्रपती आणि चीनचे उपपंतप्रधान यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुख उपस्थित राहतील.

पंतप्रधान मोदी 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पॅरिसला पोहोचणार आहेत. तिथे ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या रात्रीच्या जेवणासाठी उपस्थित राहणार आहेत. यानंतर, पंतप्रधान मोदी अमेरिका दौरा करणार आहेत. ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा ( PM Modi US Visit) आहे. नवीन प्रशासन सत्तेत आल्यानंतर तीन आठवड्यांच्या आतच, पंतप्रधान मोदींना अमेरिकेला भेट देण्याचे आमंत्रण देण्यात आलंय. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध मजबूत असल्याचं दिसतंय.

मोठी बातमी! ५ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळले, वाचा नेमकी कारणे काय?

ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान मोदी यांनी 2017 आणि 2019 मध्ये अमेरिका भेट दिली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अलीकडेच ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधानांचे विशेष दूत म्हणून उपस्थिती लावली. अमेरिकेच्या नवीन परराष्ट्रमंत्र्यांची पहिली द्विपक्षीय बैठक भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत होती. त्याच वेळी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगर्थ यांच्याशी फोनवर चर्चा केली.

पंतप्रधान मोदी 11 फेब्रुवारी 2025 रोजी एआय अॅक्शन समिटला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन इंडिया फ्रान्स सीईओ फोरमला संबोधित करणार आहे. एआय अॅक्शन समिट खूप महत्वाचे आहे, ते अशा प्रकारचे तिसरे उच्च-स्तरीय शिखर परिषद आहे. यापूर्वी ही शिखर परिषद यूके आणि दक्षिण कोरियामध्ये झालीय.

काँग्रेसचा पराभव दिसतोय, शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार; परांजपेंचा रोख नेमका कोणाकडे?

भारताच्या परराष्ट्र सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही अशा एआय अनुप्रयोगांच्या बाजूने आहोत, जे सुरक्षित आणि विश्वासार्ह आहेत. पंतप्रधान मोदी 12 फेब्रुवारी रोजी फ्रान्समधील मार्सिले येथे भारताच्या नवीन वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करणार आहेत. त्यांच्यासोबत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन देखील उपस्थित असतील, अशी माहिती मिळत आहे.

 

follow us