Download App

“जिवंत असेपर्यंत ओवेसीसमोर शपथ घेणार नाही” : भाजप आमदाराचा निर्धार, तेलंगणात हायव्होल्टेज ड्रामा

हैदराबाद : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) चे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची तेलंगणा विधानसभेच्या प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांनी त्यांना प्रोटेम स्पीकर म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्या समोर आता सर्व नवीन आमदार शपथ घेतील आणि नियमित विधानसभा अध्यक्षांची निवडणूकही त्यांच्याच देखरेखीखाली पार पडणार आहे. (AIMIM MLA Akbaruddin Owaisi takes oath as Pro-tem Speaker of Telangana Legislative Assembly)

दुसऱ्या बाजूला ओवेसी यांच्या नियुक्तीवर भाजप आमदार टी.राजा सिंह यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. जिवंत असेपर्यंत त्याच्यासमोर शपथ घेणार नाही असे, टी. राजा सिंह यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, “काँग्रेस सरकारने आदेश जारी केला आहे की, उद्या अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासमोर होणाऱ्या शपथविधीला सर्वांनी उपस्थित राहावे. पण हा राजा सिंह जिवंत असेपर्यंत एमआयएमसमोर आणि अकबरुद्दीन ओवेसींसमोर शपथ घेणार नाही.

Mahua Moitra : ‘माझ्याविरोधात कोणताही पुरावा नाही पण..,’; खासदारकी गेल्यानंतर महुआ मोईत्रांनी स्पष्ट सांगितलं

गोशामहलचे भाजप आमदार टी. राजा सिंह म्हणाले, “2018 मध्ये देखील त्याच एमआयएमआमदाराला प्रोटेम स्पीकर बनवण्यात आले होते. मी त्यावेळीही शपथ घेतली नव्हती. मला मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना विचारायचे आहे की तुम्हाला भारत राष्ट्र समितीचा मार्ग अवलंबायचा आहे का? ते म्हणायचे की बीआरएस, एमआयएम आणि भाजप एकच आहेत. आता तुमचा एमआयएमसोबत काय संबंध आहे तेही सांगा.

टी राजा सिंह रेड्डी यांना उद्देशून म्हणाले, “ सरकारी जमिनी ओवेसींच्या ताब्यात आहेत. ते तेलंगणात राहून हिंदूंना मारण्याची धमकी देतात. अशा व्यक्तीसमोर शपथ घेणार का? विधानसभेत अनेक ज्येष्ठ आमदार आहेत, त्यांनाही प्रोटेम स्पीकर बनविता आले असते. पण जाणीवपूर्वक अल्पसंख्याकांना खूश करण्यासाठी तुम्ही ही मोठी चूक केली. पण आम्ही सोडणार नाही. भाजपचे आमदार उद्या कोणत्याही परिस्थितीत शपथ घेणार नाहीत. नियमित विधानसभा अध्यक्षांची निवडणूक झाल्यानंतर आम्ही शपथ घेऊ, असेही त्यांनी पुढे सांगितले.

खासदारकी गेलीयं आता Mahua Moitra नेमकं काय करणार? पाच पर्याय आले समोर

कोण असते प्रोटेम स्पीकर :

विधानसभा निवडणूक निकालानंतर प्रत्येक राज्यात प्रथम प्रोटेम स्पीकरची निवड केली जाते. विधानसभा सचिवालयाच्या वतीने नव्या विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदारांची म्हणजेच सर्वाधिक वेळा निवडणूक जिंकलेल्या आमदारांची नावे राज्यपालांकडे पाठवली जातात. बहुतेक प्रकरणांमध्ये राज्यपाल सर्वात ज्येष्ठ आमदाराची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करतात, अशी परंपरा आहे. तथापि, बर्‍याच प्रकरणांमध्ये प्रोटेम स्पीकर निवडणं राज्यपालांवर अवलंबून असते.

अकबरुद्दीन औवेसी हे तेलंगणा विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत. ते यापूर्वी 1999, 2004 आणि 2009 असे सलग तीनवेळा आंध्र प्रदेश विधासनभेत निवडून आले होते. त्यानंतर आता 2014, 2018 आणि 2023 असे तीनवेळा तेलंगणा विधानसभेत निवडून आले आहेत. याचमुळे राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांनी त्यांना प्रोटेम स्पीकर म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ दिली. आता याच प्रोटेम स्पीकरपुढे नव्या विधानसभेतील सर्व आमदार शपथ घेणार आहेत.

Tags

follow us