Download App

Air India Express Strike : … म्हणून एअर इंडियाचे कर्मचारी टाटांच्या विरोधात घेत आहेत सामूहिक रजा

Air India Express Strike : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया एक्सप्रेसने आज अनेक उड्डाणे रद्द केली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या 300 हून

Air India Express Strike : टाटा समूहाच्या (Tata Group) मालकीच्या एअर इंडिया एक्सप्रेसने (Air India Express) आज अनेक उड्डाणे रद्द केली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या 300 हून अधिक वैमानिक आणि केबिन क्रू कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अचानक आजारपणाचे कारण देत सामूहिक रजा घेतल्याने आज एअर इंडिया एक्सप्रेसने तब्बल 90 उड्डाणे रद्द केली आहे.  अचानक उड्डाण रद्द झाल्याने प्रवाशांनी सोशल मीडियावर (Social Media) नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात आता डीजीसीए (DGCA) म्हणजेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने कंपनीकडून अहवाल मागविला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या सेवा-शर्तीमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्याला विरोध म्हणून आता अनेक कर्मचाऱ्यांनी आजारपणाचे कारण देत रजा घेत आहे. यामुळे कंपनीला अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. मात्र कंपनीकडून गैरसोय झालेल्या प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत केले जाणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

युनियनची चिंता

कंपनीच्या केबिन क्रूच्या एका विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनियनने गैरव्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या असमान वागणुकीबद्दल चिंता व्यक्त करत कंपनीवर आरोप केले आहे. एअर इंडिया एक्सप्रेस एम्प्लॉईज युनियन (AIXEU) 300 केबिन क्रू मेंबर्सचे प्रतिनिधीत्व करतात त्यांच्याकडून असा आरोप करण्यात आला आहे की, गैरव्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर परिणाम झाला आहे.

कर्मचाऱ्यांनी संप का पुकारला ?

टाटा समूहाने एयर इंडियाचा कारभार हाती घेत केलेले बदल कर्मचारीविरोधी असल्याची भावना अनेक कर्मचारी व्यक्त करत आहे. याच बरोबर कंपनीकडून एअर एशियाच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात येत आहे मात्र एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळत नसल्याचा दावा देखील अनेक कर्मचारी करत आहे.

कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनातून घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, प्रवास भत्ता हटविण्यात आल्याचा दावा कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच कंपनीकडून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना दुय्यम काम दिले जात असल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

पोलिसांची मोठी कारवाई, पीव्हीसी पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून 8.36 कोटींची रोकड जप्त

नागरी उड्डयन मंत्रालयाने मागितला अहवाल

या प्रकरणाची दाखल घेत नागरी उड्डयन मंत्रालयाने कंपनीकडून संपूर्ण घटनेचा अहवाल मागितला आहे. तर दुसरकडे डीजीसीएनेही कंपनीला मार्गदर्शक सूचनांनुसार सेवा देण्याचे निर्देश दिले आहे.

follow us

वेब स्टोरीज