पोलिसांची मोठी कारवाई, पीव्हीसी पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून 8.36 कोटींची रोकड जप्त

पोलिसांची मोठी कारवाई, पीव्हीसी पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून 8.36 कोटींची रोकड जप्त

Andhra Pradesh Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीचे (lok sabha election) वारे वाहत आहे. देशात आतापर्यंत तीन टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे तर 13 मे रोजी चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान कोणतेही गैरव्यवहार होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) अतिशय कडक भूमिका घेतली आहे.

निवडणूक आयोगाने अनेक ठिकाणी भरारी पथके तैनात केली आहेत, जी निवडणुकीदरम्यान होणाऱ्या कोणत्याही अनधिकृत कारवाया रोखण्यासाठी काम करते.

तर दुसरीकडे आंध्र प्रदेशमध्ये 13 मे रोजी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha and Assembly elections) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे या राज्यात उमेदवार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गैरव्यवहार होऊ नये यासाठी पोलीस देखील कारवाई करत आहे. अशीच एक कारवाई पोलिसांनी एनटीआर जिल्ह्यातील एका आंतरराज्यीय चेक पोस्टवर केली आहे. या कारवाई अंतर्गत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

ट्रकमध्ये 8.36 कोटींची रोकड सापडली

समोर आलेल्या माहितीनुसार, एनटीआर जिल्ह्यातील एका आंतरराज्यीय चेक पोस्टवर पीव्हीसी पाईप घेऊन जाणारा ट्रक थांबवून तपास केला असता पोलिसांना धक्का बसला आहे. या ट्रकमध्ये पोलिसांना 8.36 कोटींची रोकड सापडली. मात्र जप्त करण्यात आलेली रक्कम कोणाची आहे याबाबात अद्याप माहिती समोर आलेली नाही.

राज्य सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील महानंद डेअरी गुजरातच्या ताब्यात

पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आंतरराज्यीय चेकपोस्टवर गारिकापाडू गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत ही रक्कम जप्त केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज