Download App

राष्ट्रवादी काँग्रेस जम्मू काश्मीरसाठी तयार! स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’ नावांचा समावेश

Jammu And Kashmir Assembly Election 2024: सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी (Jammu And Kashmir

  • Written By: Last Updated:

Jammu And Kashmir Assembly Election 2024: सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी (Jammu And Kashmir Assembly Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने आपल्या 26 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह पार्थ पवार (Parth Pawar) , राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार यावेळी जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 24 जागांवर, दुसऱ्या टप्प्यात 26 जागांवर आणि तिसऱ्या टप्प्यात 40 जागांवर मतदान होणार आहे तर 04 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या यादीत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, कोहिल, ब्रिजमोहन श्रीवास्तव, छगन भुजबळ, शैल जलालुद्दीन, रुही अंजुमन, पार्थ पवार, उमाशंकर यादव, नवीन कुमार, धीरज शर्मा, चैतन्य मानकर (सनी), फैज अहमद यांचा समावेश आहे. फैज, आलम रिझवी, तारिक रासोरी, के. लतियाल, अरुण रैना, फैयाज अहमद दार, हरिस ताहिर भट, फिरोज अहमद रंगराज, तवसील भट, संजय कौत, लेशाद अहमद गनी, ऐशिया बेगम, सलीमा अख्तर यांच्या नावांचा समावेश आहे.

तर दुसरीकडे तीन टप्प्यात होणाऱ्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने युतीची घोषणा केली आहे. यावेळी नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला म्हणाले की, आम्ही या निवडणुकीत काँग्रेससोबत लढणार आहे आणि आमचे प्राधान्य राज्यत्वाला असेल.

चौरंगी शिक्षा अन् कायद्याची भीती, यवतमाळच्या वणीत उमेदवार जाहीर करताना ठाकरेंची ‘राज’ गर्जना

follow us