Ajit Pawar : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सलग सातव्यांदा देशाचा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर आता विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हा अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा आहे. हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाच्या आशा-आकांक्षा-अपेक्षांची पूर्तता करणारा आहे तसेच शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, रोजगार, स्वयंरोजगार, विज्ञान, संशोधन, कौशल्यविकास, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण अशा सर्व क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा आणि देशाला मजबूत करणारा बजेट आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकार देशाला विकसित राष्ट्र आणि विश्वशक्ती बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आम्हाला स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवाआधी हे स्वप्न पूर्ण करायचे आहे. या स्वप्नपूर्तीसाठी दूरदृष्टीने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. असं देखील अजित पवार म्हणाले. तसेच 1.52 लाख कोटींची शेती व संलग्न क्षेत्रांसाठी केलेली तरतूद महत्वाची आहे. त्यातून शेती क्षेत्रासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यास मदत होणार असं देखील अजित पवार म्हणाले.
अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रासाठी काय
तरुणांसाठी – निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात तरुणांसाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात पाच वर्षाच्या कालावधीसाठी दोन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 4.1 कोटी तरुणांना कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी सरकारने पाच योजना जाहीर केले आहे. याच बरोबर सरकारने 1 कोटी तरुणांना 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देखील मिळणार आहे.
इंटर्नशिप करताना दरमहा 6 हजार रुपयांच्या अतिरिक्त भत्त्यासह 5000 रुपये भत्ता मिळणार आहे. याच बरोबर सर्व क्षेत्रांमध्ये पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्यांना सरकार दोन वर्षांसाठी दरमहा 300 रुपये अतिरिक्त पीएफ देणार आहे.
शेती – या अर्थसंकल्पात कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद सरकारकडून करण्यात आली आहे. तसेच यावेळी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी देखील सरकारने तयारी केली आहे सरकारकडून येणाऱ्या काही दिवसात तब्बल 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन करण्यात येणार आहे.
आरोग्य – तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी 90 हजार 171 कोटींची तरतूद केली आहे. मागणी वर्षाच्या तुलनेत 12 टक्क्यांची वाढ यावेळी करण्यात आली आहे. तसेच या बजेटमध्ये सरकारने मोठी घोषणा करत कॅन्सरवरील तीन औषधे स्वस्त केली आहे. त्यामुळे आता कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महिलांसाठी – सरकारने या अर्थसंकल्पात महिलांसाठी देखील मोठ्या घोषणा केल्या आहे. यावेळी महिलांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100 हून अधिक शाखा ईशान्येकडील भागात स्थापन केल्या जातील.
ससून रुग्णालयात धक्कादायक प्रकार, बेवारस रुग्णांचे हाल, रिक्षावाल्याला पाचशे रुपये अन् …
नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे बांधली जाणार आहेत. त्याचबरोबर उत्पादन क्षेत्रातील एमएसएमईसाठी कर्ज हमी योजना सुरू केली जाईल, 100 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतीही हमी आवश्यक नाही असे अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारमण यांनी सांगितले.