Download App

वैयक्तिक स्वार्थासाठी हुकूमशहा सत्तेचे गुणगान, अलका लांबा यांचा पवारांवर हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Alka Lamba angry at Pawar’s stand : हिंडेनबर्ग अहवालानंतर (Hindenburg Report) देशात प्रसिध्द गौतम अदानींची (autam Adani)जेपीसी मार्फत चौकशी व्हावी, अशी विरोधकांनी मागणी लावून धरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्याविरोधात देशभरात कॉंग्रेसने आंदोलने देखील केली. तर संसदेतही कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी गौतम अदानींची जेपीसी मार्फत नाही तर सुप्रीम कोर्टामार्फत चौकशी व्हावी, असं विधान केलं. त्यानंतर कॉंग्रेस नेत्याा अलका लांबा (Alka Lamba) यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. आज फक्त घाबरलेले, लोभी लोक त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी हुकूमशीही सत्तेचे गुणगाण गात असल्याची टीका त्यांनी केली.

हिंडनबर्ग प्रकणावरून गौतम अदानी यांनी टार्गेट केलं जात आहे. या प्रकरणावरून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी पक्षांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळलं. कॉंग्रेससह विरोधकांनी जेपीसीची मागणी केली होती. संपूर्ण देशात गौतम अदानी आणि हिंडनबर्ग प्रकरणावरून चर्चा सुरू असतांना मात्र, शरद पवारांनी याबाबत आता मोठं वक्तव्यं केलं. गौतम अदानींची जेपीसी मार्फत नाही तर सुप्रीम कोर्टामार्फत चौकशी व्हावी, असं विधान पवारांनी केलं आहे. पवारांनी दिलेल्या या प्रतिक्रियेवरून राज्यासह देशभरात उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी गौतम अदानी यांनी क्लीनचीट दिली अशीही चर्चा देशात सुरू झाली आहे.

Dhananjay Munde : पंचनामे कुठपर्यंत आलेत सरकार सांगेल का?, धनंजय मुंडे यांचा सवाल

दरम्यान, अलका लांबा यांनी पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अलका लांबा यांनी ट्विट करत लिहिलं की, आज फक्त घाबरलेले, लोभी लोक त्यांच्या वैयक्तीक स्वार्थासाठी हुकूमशाही सत्तेचे गुणगाण गात आहेत. फक्त एकटे राहुल गांधी जनतेची लढाई लढत आहे. भांडवलदार चोरांसी आणि चोरांना संरक्षण देणाऱ्या चौकीदाविरूध्द राहुल गांधी लढत आहेत, अशा आशयाचं त्यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटसोबत त्यांनी गौतम अदानी आणि शरद पवार यांचा फोटोही जोडला आहे.



काय म्हणाले शरद पवार?

संसदेत संख्याबळ पाहता जेपीसीमध्ये 21 सदस्य असतील तर सत्ताधारी पक्षाचे 15 आणि विरोधी पक्षांचे सहा सदस्य असतील, त्यामुळे समितीवर शंका निर्माण होईल, असे पवार म्हणाले होते. मी जेपीसीच्या विरोधात नाही. जेपीसी अनेक वेळा स्थापन झाल्या आहेत आणि मी काही जेपीसीचा अध्यक्ष आहे. JPC ची स्थापना बहुमताच्या आधारे (संसदेत) केली जाईल. JPC ऐवजी सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक योग्य आणि प्रभावी ठरेल असे माझे मत आहे.

Tags

follow us